Health Center Dainik Gomantak
गोवा

Ponda News : उपआरोग्य केंद्राचे स्थलांतर करा

निरंकाल ग्रामस्थांची मागणी : ४५ वर्षांपासून भाडोत्री जागेत उपचार

गोमन्तक डिजिटल टीम

एकनाथ खेडेकर

फोंडा : गवळवाडा-निरंकाल येथील उपआरोग्य केंद्र गेल्या ४५ वर्षांपासून भाडोत्री खोलीत सुरू आहे. पावसाळ्यात या केंद्रात गळती होत असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ होते. परिसरातील रुग्णांना उपआरोग्य केंद्र उपयुक्त ठरत असले, तरी जागा अपुरी पडत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेर उभे राहावे लागते. रुग्णांना चांगली सुविधा देण्यासाठी परिसरात असलेल्या बंद सरकारी प्राथमिक विद्यालयात किंवा वन खात्याच्या इमारतीत उपआरोग्य केंद्राचे स्थलांतर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या देखरेखीखाली येणाऱ्या उपआरोग्य केंद्रात निरंकाल, गवळवाडा, मायणे, कुंभारवाडा, शिग्नेव्हाळ, सातेरीमळ, बिबळवाडा, गवळीवाडा, कोनसे, कसमशेळ व अन्य भागातील रुग्ण किरकोळ उपचारासाठी दाखल होतात. येथे दर बुधवारी डॉक्टर उपलब्ध असतात त्या दिवशी रुग्णाची अधिक गर्दी दिसून येते. इतर दिवसांत ४ कर्मचारी रुग्णांना आवश्यक औषधे तसेच ड्रेसिंग करण्याचे काम करतात. प्रतिदिन १५-२० रुग्ण उपआरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. परंतु केंद्राची खोली लहान असल्याने रुग्णांना बाहेर भर उन्हात उभे राहावे लागते.

परिसरात डॉक्टर उपलब्ध नसल्याने आपत्कालीन वेळी रुग्णांना शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात जावे लागते. त्यामुळे गवळवाडा येथील उपआरोग्य केंद्रात पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत. ग्रामीण भाग असल्याने रात्रीच्यावेळी रुग्णाला उपचारासाठी नेण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागते. त्यामुळे निदान दिवसभरात उपआरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध करून देण्याची गरज स्थानिक लोक व्यक्त करीत आहेत.

मंत्र्यांना निवेदन सादर

कोनसे येथील समाजसेवक हेमंत सामंत यांनी ग्रामीण आरोग्य केंद्राची सुधारणा करण्यासाठी नुकतेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आरोग्य खाते व अन्य संबंधितांना निवेदन पाठविली आहेत. परिसरात असलेले उपआरोग्य केंद्र स्थानिक लोकांसाठी उपयुक्त ठरत आहे. परंतु छपरातून पावसाळ्यात खोलीत पाण्याची गळती होत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होते. तसेच केंद्रातील कर्मचाऱ्यांना गळती होणाऱ्या पाण्यापासून औषधे वाचविण्याची वेळ येते. परिसरात गेल्या काही वर्षापासून सरकारी प्राथमिक विद्यालय बंद असल्याने त्या ठिकाणी उपआरोग्य केंद्र स्थलांतर करण्याची मागणी, हेमंत सामंत यांनी निवेदनात केली आहे.

वन खात्याची जागा द्या : गवळवाडा-निरंकाल येथे वन खात्याच्या काही खोल्या रिकाम्या स्थितीत आहेत. मुख्य म्हणजे मुख्य रस्त्याच्या बाजूला व खात्याच्या खोल्या असल्याने त्या ठिकाणी उपआरोग्य केंद्राचे स्थलांतर केल्यास रुग्णांची चांगली सोय होणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे वन खात्याचा ताबा असल्याने त्यांनी या रिकाम्या असलेल्या खोल्या उपलब्ध करून द्यावे, असेही ग्रामस्थाचे मत आहे.

बेतोडा पंचायतीतर्फेही उपआरोग्य केंद्रात सुधारणा करण्यासाठी आरोग्य खात्याला पत्र पाठविण्यात येणार आहे. केंद्राची स्थिती बिकट बनल्याने रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी आरोग्य खात्याने सुसज्ज जागेत केंद्र स्थलांतर करण्याची गरज आहे.

- उमेश गावडे, सरपंच, बेतोडा पंचायत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT