Chicalim Hospital: चिखली उपजिल्हा रूग्णालयात आता मोतीबिंदू शस्त्रक्रियाही होणार...

पारादीप फॉस्फेट्स कंपनीने चिखली रूग्णालयाला दिली 22 लाख रूपयांची उपकरणे
Chicalim Hospital
Chicalim HospitalDainik Gomantak
Published on
Updated on

Chicalim Hospital: झुआरीनगरच्या पारादीप फॉस्फेट्स लिमिटेडने उद्योगाची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत चिखली उपजिल्हा इस्पितळासाठी मोतीबिंदु शस्त्रक्रियाला लागणारी 22 लाख रुपयांची उपकरणे दिली.

यामुळे वास्कोवासियांची मोठी सोय होण्यास मदत होणार आहे. येथे मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्याची सुविधा नसल्याने संबंधितांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात किंवा गोवा वैद्यकीय इस्पितळामध्ये जावे लागत होते.

Chicalim Hospital
Luizinho Faleiro: खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लुईझिन काय म्हणाले? कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते ही उपकरणे इस्पितळाच्या नेत्रतज्ज्ञ रेणु पै यांच्याकडे सोपविण्यात आली. याप्रसंगी इस्पितळाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल उम्रास्कर, पारादीप फॉस्फेट्सचे गोवा प्लँट प्रमुख नीलेश देसाई, जनसंपर्क अधिकारी आनंद राजाध्यक्ष, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर आदी उपस्थित होते.

गुदिन्हो यांनी पारादीप फॉस्फेट्सच्या सामाजिक जबाबदारीचे कौतुक केले. यापुर्वीही या कंपनीने इस्पितळाला योग्य ती मदत केल्याचे त्यांनी सांगितले. येथे मोतीबिंदु शस्त्रक्रिया होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या इस्पितळाला भेट देण्याचे आवासन दिले आहे. या इस्पितळाला पुरेशे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी मिळावेत यासाठी त्यांच्याकडे चर्चा करण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

Chicalim Hospital
Calangute Police: कळंगुटमध्ये भिकाऱ्यांची धरपकड; पोलिसांनी राबवली मोहिम

डॉ. उम्रस्कर यांनी या उपकरणामुळे इस्पितळाला एक चांगली सुविधा सांगितले. येथून मिळाल्याचे सांगितले. महिन्याकाठी 50 ते 60 नागरिक मोतीबिंदु शस्त्रक्रियासाठी मडगाव किंवा बांबोळी येथील रूग्णालयात पाठविले जातात. येथे नेत्रतपासणी, रक्तचाचणी व इतर गोष्टी करण्यात येत होत्या. परंतू मोतीबिंदु शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना मडगाव किंवा बांबोळी येथे जावे लागत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com