फोंडा: येथील गटार व्यवस्था कोलमडल्याने बाजारपेठेत सध्या दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याचा बराच त्रास ग्राहक व विक्रेत्यांना होत आहे. पालिकेने याकडे दुर्लक्ष चालविल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, गटार उपसण्याचे काम पालिकेने हाती घेतले असले तरी सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने लोकांना नाक धरून चालावे लागते. त्यात गटार उसण्यासाठी लाद्या काढून रस्त्यांवर ठेवण्यात आल्याने वाहतुकीलाही अडसर होत आहे.
पालिकेने मार्च महिन्यातच गटर उपसण्याचे काम केले होते. पण हे व्यवस्थित न झाल्याने पावसात हे गटार पुन्हा भरले व सांडपाणी रस्त्यांवरून वाहू लागले. त्यामुळे पालिकेला चार महिन्यांतच हे काम परत एकदा हाती घ्यावी लागले.
गटार उपसण्यासाठी ठिकठिकाणी लाद्या खोदून ठेवण्यात आल्यामुळे दुर्गंधीबरोबर डास पैदासही वाढली आहे. या विरोधात तक्रार करूनही नगराध्यक्ष वा स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, इथल्या प्रभू टॉवर्स समोर मोठा खड्डा पडल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते.
पालिकेने गटार उपसण्याचे काम हाती घेतले असले तरी येथे काम करणारे कामगार व सुपरवायझरची मनमानी सुरू आहे. गटार उपसण्यासाठी गटारांवरील लाद्या सध्या काढल्या आहेत, त्यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुर्गंधीबरोबरच गटारावर लाद्या नसल्याने वाहनेही आत नेता येत नाहीत. याबाबत येथे काम करणारे कामगार वा सुपरवायझरला विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात, त्यामुळे लोक पालिकेच्या एकूणच कारभारावर प्रचंड चिडले आहेत. दरम्यान, या प्रकाराचा फोंडा विकास समितीने निषेध केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.