Ponda Accident Dainik Gomantak
गोवा

Ponda Accident: 'हिट ॲण्ड रन'मुळे फोंड्यात दोघे जखमी, एकजण ताब्यात; एक वाहनचालक पसार

Ponda hit and run accident: फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत दोघा जणांना वाहनाने ठोकरण्याचा प्रकार घडला

Sameer Amunekar

फोंडा: फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत दोघा जणांना वाहनाने ठोकरण्याचा प्रकार घडला असून एका वाहनासह चालकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या अपघातातील वाहनचालक पादचाऱ्याला घडक देऊन पसार झाला.

दोन्ही पादचारी रस्त्याच्या कडेने चालत होते. काल (शुक्रवारी) संध्याकाळी आणि आज शनिवारी सकाळी असे है अपघात घडले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी बाडी तळावली येथे रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या अक्षता गावकर (वय ३० वर्षे) यांना जोए-०७-एन-४८८२ या क्रमांकाच्या कारची जोरदार ठोकर बसल्याने त्या उसळून रस्त्याच्या कडेला आपटल्या.

त्यात त्या गंभीर जखमी झाल्या, अपघात होऊनही पंचवीस वर्षीय कारचालक घटनास्थळाहून फ्लार झाला. मात्र, नंतर त्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. जखमी अक्षता यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

फोंडा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. आज शनिवारी सकाळी कुटों येथे झालेल्या अन्य एका अपघातात एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने रायत कुटी येथील मंगलदास सतरकर (वय ४६ वर्षे) हे गंभीर जखमी झाला.

मंगलदास सतरकर हे रस्त्याच्या कडेने चालत जात असताना मागून आलेल्या वाहनाची जोरदार ठोकर बसल्याने मंगलदास रस्त्यावर फेकले गेले आणि जखमी झाला. त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचीही फोंडा पोलिस चौकशी करीत असून पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT