Kushavati District Goa: तिसऱ्या जिल्ह्यावरून वाद थांबेना! ‘कुशावती’चे मुख्यालय केपे नको; काणकोणवासीयांचे मत

Canacona: तिसऱ्या कुशावती जिल्ह्याच्या मुख्यालयाला काणकोण वासीयांचा विरोध आहे, मात्र भाजप कार्यकर्त्यांकडून त्याचे समर्थन करण्यात येत आहे.
Goa Third District
Goa Third DistrictDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: तिसऱ्या कुशावती जिल्ह्याच्या मुख्यालयाला काणकोण वासीयांचा विरोध आहे, मात्र भाजप कार्यकर्त्यांकडून त्याचे समर्थन करण्यात येत आहे. तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असणार आहे. मात्र केपेला जाण्यासाठी वाहतुकीची सोय नसल्याने काणकोणवासीयांतून त्याला विरोध होत आहे. त्यामुळे तिसऱ्या जिल्ह्याचा मुद्दा सध्या तापत आहे.

काणकोणातून दिवसातून फक्त तीन खासगी प्रवासी बस काणकोण ते सावर्डे व्हाया बाळ्ळी, अशी सेवा देतात. अन्यथा काणकोणमधील रहिवाशांना मडगावहून केपे असा प्रवास करावा लागतो.

सध्या काणकोण तालुक्याचा दक्षिण गोवा जिल्ह्यात समावेश आहे, त्याचे मुख्यालय मडगाव आहे, ते काणकोणवासीयांना केपेपेक्षा जास्त सोयीस्कर आहे, असे रेव्हल्युशनरी गोवन पक्षाचे प्रशांत पागी यांनी सांगितले. गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांनी सांगितले, की आमचा तिसऱ्या जिल्ह्याला विरोध नाही, मात्र मुख्यालयाला विरोध आहे. मुख्यालयाच्या बाबतीत फेर विचार न झाल्यास आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रशासन होईल लोकाभिमुख ः सर्वानंद भगत

तिसऱ्या जिल्ह्याचे निर्माण झाल्याने प्रशासन लोकांच्या दारात पोहचण्यास मदत होणार आहे.त्याचप्रमाणे प्रशासन लोकाभिमुख होईल, असे भाजपचे सर्वानंद भगत यांनी सांगितले. नवीन जिल्हा झाल्याने आरोग्य सेवा दारात उपलब्ध होईल. सध्या जिल्हा इस्पितळ मडगाव येथे आहे. नवीन जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा इस्पितळाची निर्मिती होईल. महसुली व जमिनी संदर्भातील सर्व प्रश्न हाताळण्यासाठी नवी यंत्रणा उभी राहणार आहे. निसर्ग पर्यटनालाही चालना मिळेल, असेही भगत म्हणाले.

Goa Third District
Kushavati District: "पायाभूत सुविधा निर्माण होतील, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील"! ‘कुशावती’वरून दामूंचे स्पष्टीकरण

केंद्राच्या योजनांचा मिळेल लाभ; मंत्री तवडकर

गोवा मुक्ती नंतर केपे,सांगे व काणकोण व आता धारबांदोडा या तालुक्यांचा अपेक्षेप्रमाणे सर्वच क्षेत्रात विकास झाला नाही, तिसऱ्या कुशावती जिल्ह्यात त्यांचा समावेश झाल्याने केंद्र सरकारच्या विविध योजनांचा या जिल्ह्याला फायदा होणार आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून हा विषय स्पष्ट केला आहे. तरीही कुणाला त्याबाबतीत शंका कुशंका असतील, तर योग्य व्यासपीठावर त्या मांडण्यासाठी सर्व नागरिक मुक्त आहेत, असे कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.

Goa Third District
Kushavati District Goa: 'कामे झाली तरच उपयोग'! नव्या ‘कुशावती’ जिल्ह्याकडून लोकांच्या अपेक्षा; काय आहेत प्रतिक्रिया, वाचा..

काय साध्य होणार; जनार्दन भंडारी

काणकोणवासीयांना दुसऱ्या जिल्ह्यात आवश्यक सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. मूलभूत सेवा मिळविण्यासाठी आंदोलने करावी लागतात. आता काणकोण तालुक्याचा कुशावती जिल्ह्यात समावेश झाला आहे. येथे आरोग्य केंद्राची इमारत आहे, मात्र डॉक्टर व अन्य यंत्रणा नाही. अग्निशामक केंद्र चापोली या निर्जन जागी हलवले आहे‌. वनखात्याचा फॉरेस्ट सेटलमेंट अधिकारी उपलब्ध होत नाही, अशा स्थितीत तिसरा जिल्हा करून काय साध्य होणार, असा सवाल कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com