

मडगाव: बड्डे येथील मारहाण प्रकरणी आफताब सवनूर, समीर अहमद अगसनहल्ली, इम्तियाज कमदोड, संजय कोडगणवार व जाफर तिलावली यांना दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले.
आरोपींची परिविक्षा कायद्यानुसार एक वर्षासाठी चांगले वर्तन राखणे, १५ हजारांचे हमीपत्र व तेवढ्याच रकमेच्या हमीदाराच्या अटीवर सुटका केली आहे.
आरोपींवर बड्डे, मडगाव येथे २० मे २०१९ साली विश्वास गुरव यांची कार अडवून शिवीगाळ करणे व मारहाण करणे बेकायदा जमाव, दंगा करणे, बेकायदा अडवणे, अवमान करत दुखापत करणे आदी गुन्ह्याखाली दोषी ठरवले आहे.
स्वरुची शोरुमच्या समोरील रस्त्यावर मारहाणीची घटना घडली होती. दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयातील सुनावणीवेळी संशयितांना बेकायदा जमाव करणे, धारदार शस्त्रे घेऊन दंगा करणे, बेकायदेशीरपणे अडवणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अवमान करणे,
दुखापत करणे यासाठी दोषी ठरवण्यात आले तर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून मुक्त केले. एका वर्षाच्या परिविक्षा कालावधीत आरोपींनी शांतता राखणे तसेच कोणत्याही गुन्ह्यात सहभाग न होण्याच्या अटींचे पालन करावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.