Ponda Forest Festival  Dainik Gomantak
गोवा

Forest Festival : ‘फोंडा लायन्स’तर्फे फर्मागुढीत वनमहोत्सव

Ponda Forest Festival : यावेळी लायन्स फोंडा क्लबचे सदस्य वन खात्याचे अधिकारी व पीईएस फार्मासिटिकल महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा, लायन्स क्लब ऑफ फोंडा, पीईएस राजाराम ताराबाई फार्मसी महाविद्यालय व वनखात्याच्या संयुक्त विद्यमाने फर्मागुढी फोंडा येथील फार्मसी महाविद्यालय परिसरात वन महोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी लायन्स फोंडा क्लबचे सदस्य वन खात्याचे अधिकारी व पीईएस फार्मासिटिकल महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

क्लबचे अध्यक्ष मनिष धारेश्वर, वनखात्याचे उपवनपाल विशाल सुर्वे व शिक्षण संस्थेचे सचिव रितेश नाईक, कृषिमंत्री रवी नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करून वन महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात सुमारे ५० फळ व औषधी झाडांची लागवड करण्यात आली.

मंत्री रवी नाईक यांनी आज प्रत्येकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक पेड मा के नाम’ या शीर्षकाखाली वन महोत्सव साजरा करून आपण लावलेले रोपटे व त्याची काळजी घेऊन त्याची चांगली निगा घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

उपवनपाल विशाल सुर्वे यांनी सांगितले,की आतापर्यंत सुमारे दोन लाख रोपांची लागवड झाली आहे. यावेळी फार्मसी कॉलेजमध्ये घेतलेल्या निसर्ग या विषयावरील चित्रकला स्पर्धेची बक्षिसे विजेत्यांना प्रदान केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रितेश नाईक,डॉ. वेदपाल तारी, व खजिनदार अंशुल सिंगल यांनी हातभार लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT