Ponda Fish Market Dainik Gomantak
गोवा

Ponda Fish Market: अस्वच्छतेचा कळस! फोंडा मासळी मार्केटमध्ये दुर्गंधी अन् किड्यांचं साम्राज्य; अनागोंदी कारभारावर व्यापाऱ्यांचा संताप

Ponda Fish Market hygiene issues: फोंडा मासळी मार्केटमध्ये अनागोंदी सुरू असून पालिकेकडून साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनीच केला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: फोंडा मासळी मार्केटमध्ये अनागोंदी सुरू असून पालिकेकडून साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनीच केला होता. त्यानंतर बुधवारी मार्केट परिसराची पाहणी करून पालिकेला सफाईसाठी आवश्‍यक सूचना करण्यात आल्या. फोंडा आरोग्य खाते तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्तरीत्या ही तपासणी केली. विशेष म्हणजे परिसरात कीडे वळवळत असल्याचे दृष्य समोर आले आहे.

फोंड्यातील जुनी मासळी मार्केट (Fish Market) इमारत जीर्ण झाल्यामुळे ही इमारत पाडून त्याजागी नवीन पालिका बाजारसाठी नवीन वास्तू उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्यांना नवीन प्रकल्पाच्या तळमजल्यावर हलवण्यात आले आहे, पण या तात्पुरत्या मासळी बाजारची योग्य साफसफाई केली जात नसल्याने या ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे.

दरम्यान, मासे विक्रेते टाकाऊ मासे इतस्ततः फेकत असल्याने ही अस्वच्छता पसरत आहे. पालिका नित्य साफसफाई करते, पण व्यापाऱ्यांच्या अनास्थेमुळे हा प्रकार होत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगितले. या पाहणीवेळी फोंडा आरोग्य खात्याच्या प्रमुख डॉ. स्मिता पार्सेकर तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

‘सोपो’च्या नावाखाली ‘लूट’

मासळी मार्केट परिसरातील विक्रेत्यांकडून पालिका सोपो कर वसूल करते पण या विक्रेत्यांना दिलेल्या पैशांची पावतीच दिली जात नाही, असा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. सोपोच्या नावाखाली घेण्यात येणारा हा पैसा कुणाच्या खिशात जातो, असा सवाल करून फोंडा पालिकेने याप्रकरणी स्वच्छ कारभार ठेवावा, असेही मासे विक्रेते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT