Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda: अग्निशमन दलाच्या आवारात पेट्रोलपंप! फोंडावासीयांचा विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयात हरकत दाखल

Ponda Petrol Pump Protest: फोंडावासीयांनी या पेट्रोलपंपला तीव्र विरोध करीत आपली हरकत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दाखल केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: येथील अग्निशमन दलाच्या आवारात सरकारी जागेत खासगी पेट्रोलपंप उभारण्याच्या हालचाली सध्या सुरू असून फोंडावासीयांनी या पेट्रोलपंपला तीव्र विरोध करीत आपली हरकत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दाखल केली आहे.

कोणताही मुलाहिजा न बाळगता कशाप्रकारे पेट्रोलपंपचे परवाने दिले जातात, त्याची ही एक झलक आहे.विद्यालय तसेच लोकवस्ती आणि स्मशानभूमी जवळ असलेल्या फोंड्यातील अग्निशामक दलाच्या आवारात सुमारे अकराशे चौरस मीटर जागेत हा पेट्रोलपंप येऊ घातला आहे.

या विरोधात फोंड्यातील जॉन मास्कारेन्हस, विराज सप्रे आणि सुदेश नाईक यांनी आपली हरकत दाखल केली आहे. फोंड्यातील अग्निशामक दलाच्या आवारात मुख्य रस्त्याच्या बाजूलाच हा पेट्रोलपंप येऊ घातला आहे,

त्याला कुणाची हरकत असल्यास त्यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावी, अशी जाहिरात वर्तमानपत्रात आल्यानंतर याबाबतची माहिती फोंडावासीयांना मिळाली.

विद्यालय, स्मशानभूमी जवळ असूनही!

फोंड्यातील मुख्य रस्त्यावर ज्या ठिकाणी आल्मेदा हायस्कूल तसेच मुक्तिधाम स्मशानभूमी अगदी जवळ आहे, शिवाय समोरच निवासी संकुल आहे, अशा ठिकाणी हा पेट्रोलपंप येणार आहे. वास्तविक विद्यालय, स्मशानभूमी आणि निवासी संकुल जवळ असल्यास पेट्रोलपंपला परवानगी दिली जात नाही, मग या ठिकाणी पेट्रोलपंप आणण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्‍न जॉन मास्कारेन्हस आणि विराज सप्रे यांनी उपस्थित केला.

सरकारी जमिनीचा गैरवापर?

फोंड्यातील या सरकारी जागेत अग्निशामक दलाची वास्तू आहे, अशा ठिकाणी आणि जवळच विजेचा ट्रान्स्फॉर्मर आहे, ज्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वाहनाची येजा सुरू असते अशा ठिकाणी पेट्रोलपंपसाठी नियोजन करण्यात येत आहे. संबंधित इंधन कंपनीकडून अशाप्रकारची सूचना कशी काय केली जाते, असा प्रश्‍न फोंडावासीयांना पडला आहे. त्यामुळे सरकारी जमिनीचा गैरवापर केला जात आहे, अशी टीका फोंडावासीयांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT