Ponda Dengue Patient Dainik Gomantak
गोवा

Ponda Dengue Patient : फोंडा तालुक्यात डेंग्यूचे ८ संशयास्पद रूग्ण

Ponda Dengue Patient : धारबांदोड्यात ४ संशयित ः साथीच्या नियंत्रणासाठी आरोग्य केंद्रांकडून शर्थीचे प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Dengue Patient :

फोंडा, डेंग्यूने आता पुन्हा डोके वर काढले असून फोंडा तालुक्यातील मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात व फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी २ तर बेतकी - खांडोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

फोंडा तालुक्यात एकूण ८ तर धारबांदोडातील पिळये आरोग्य केंद्रात ४ संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण आढळले.

शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही रुग्ण आढळलेला नाही. धारबांदोड्यात आढळले संशयास्पद रुग्ण फोंडा भागात कामासाठी जात आहेत. सध्या स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस तसेच अचानक ऊन पडत असल्याने डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याचे प्रकार वाढत आहेत. मडकई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. उत्कर्ष जल्मी, फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर, बेतकी - खांडोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. संगीता केळुसकर व पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मडकईकर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पिळये प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीत आढळलेले संशयास्पद रुग्ण इतर गावांतून आलेले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तर फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळलेले २ संशयास्पद रुग्ण शांतीनगर - फोंडा येथील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

VIDEO: कदंब कर्मचाऱ्यांवर कोयता घेऊन धावला; हल्ल्याच्या प्रयत्नानंतर रिवे मार्गावरील बससेवा दोन दिवसांपासून बंद

Goa Electricity: गोव्यात 80 मेगावॅट वीजटंचाई; उद्योगांना भारनियमनाचा धोका, बैठकीतही तोडगा नाही

विकासाचे आकडे वाढले, मग गोमंतकीय सुखी का नाहीत?; निवडणुकीआधी जनतेच्या अपेक्षांचा हिशेब मांडण्याची वेळ

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

SCROLL FOR NEXT