

वाळपई: रिवे-गोळावली मार्गावर धावणाऱ्या कदंब बसच्या चालक आणि वाहकावर एका युवकाने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
चोरीच्या उद्देशाने मंदिर परिसरात आलेल्या युवकाला जाब विचारल्यानंतर त्याने चालक व वाहकाच्या अंगावर कोयता घेऊन धावून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या दोन दिवसांपासून पणजी-वाळपई-गोळावली-रिवे मार्गावरील कदंब बससेवा बंद असून विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
वाहक-चालक जीव मुठीत घेऊन धावले
मोबाईलवर मोठा आवाज येत असल्याने बस कर्मचाऱ्यांनी त्या युवकांना जाब विचारला. त्यावेळी दोन्ही युवकांनी बस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एका युवकाने कोयता हातात घेऊन बस कर्मचाऱ्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या झटापटीत संबंधित युवकालाच कोयत्यामुळे दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी बस कर्मचाऱ्यांनी कदंब बसकडे धाव घेऊन आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी वाळपई पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.