Goa BJP  Dainik Gomantak
गोवा

भाजपच्या नावाने बोटे मोडणारे रवींचे कार्यकर्ते आता भाजपचे गातात गुणगान

‘छुप्या रुस्तमांचा’ जोर : अनुभवी विरुद्ध नवखे लढत

दैनिक गोमन्तक

फोंडा: ‘कोणी कोणाचा नाही, राजा’ या नटसम्राट नाटकातील वाक्याचा प्रत्यय सध्या जेवढा फोंड्यात येत आहे, तेवढा अन्यत्र येत नसेल. सध्या नेतेच नव्हे तर कार्यकर्ते सुध्दा मुखवटे परिधान करून वावरताना दिसत आहेत. त्यामुळे फोंडा मतदारसंघात तीव्र चुरस निर्माण झाली आहे. कुर्टी खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच संदीप खांडेपारकर यांनी रिंगणात उडी घेऊन या चुरशीला अधिकच धार आणली आहे. कार्यकर्त्यांना त्यामुळे आणखी एक ‘निवासस्थान’ मिळाले आहे. खांडेपारकर यांचा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या वेळी कुर्टी खांडेपार पंचायतीचे सरपंच भिका केरकर, विद्यमान पंच व माजी सरपंच नावेद तहसिलदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते दिसत होते. भिका केरकर हे मगोपचे समर्थक म्हणून गणले जात असल्यामुळे त्यांची ‘मुव्ह’ अचंबित करून टाकणारी होती. (Ponda constituency in state of turmoil in goa)

केरकर यांना पंचायतीत सध्या मगोप पंचाचेही समर्थनही लाभले आहे. त्यामुळे त्यांचे खांडेपारकरांच्या बाजूने असणे समीकरणे बदलल्याची नांदी वाटत होती. असे अनेक धक्के सध्या फोंडा मतदारसंघात अनुभवयाला मिळतात.

सध्या फोंड्यात (Ponda) भाजप कॉंग्रेस, मगोप, आप, रिव्होल्युशनरी गोवा व अपक्ष संदीप खांडेपारकर रिंगणात आहेत. रवी नाईक हे यातील सर्वात अनुभवी उमेदवार फोंड्यातून ते पाचवेळा निवडून आलेले आहेत. खासकरून 2002 साली त्यांची व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची फोंड्यात झालेली ‘संघर्षमय झुंज’ तर आज सुध्दा लोक आठवतात. त्यांच्या यशात त्यांच्या ‘रवीनीती’ चा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या हातात जेवढे पत्ते असतात त्याच्यापेक्षा अधिक पत्ते त्यांच्या ‘अस्‍तनीत’ असतात. याचे प्रात्यक्षिक अनेक निवडणुकीत त्यांनी दाखवले आहे.गेल्यावेळेला भाजपच्या नावाने बोटे मोडणारे रवींचे कार्यकर्ते आता भाजपचे गुणगान गाताना दिसतात, तर रवीच्या नावाने ‘कंठशोष’ करणारे भाजपचे कार्यकर्ते आता रवींचा विजय असो, अशा घोषणा देताना दिसताहेत. हा रवी नीतीचा भाग का काळाचा महिमा याचा शोध घेण्यात राजकीय विश्लेषक दंग दिसताहेत.

पण 1999 पासून लढवलेल्या सर्व निवडणुका त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर लढविल्या होत्या. यावेळी ते भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या भूमिकेत ती पूर्वीची रवी नीती ते कसे वापरतात हे बघावे लागेल. परवाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला चांगला प्रतिसाद लाभल्यामुळे भाजप (Goa BJP) कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे. रवी बरोबर सध्या फोंडा भाजपच्या गटसमितीचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, नगरसेवक आनंद नाईक, माजी नगरसेवक यशवंत खेडेकर ,ॲड. मनोहर आडपईकर, कुर्टी खांडेपारचे पंच दादी नाईकसह अनेक कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसताहेत.

दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे (Goa Congress) राजेश वेरेकर हिरीरीने कामाला लागले असून फोंड्यातील कॉंग्रेसची मते अधिक मागच्या वेळी घेतलेली वैयक्तिक मते आपल्या मदतीला येतील, असा त्यांचा अंदाज आहे. त्यांच्याबरोबर सध्या रवींचेच पूर्वीचे समर्थक कुर्टी खांडेपारचे माजी सरपंच जॉन परेरा, माजी गटाध्यक्ष अरुण गुडेकर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेख शब्बीर हे फिरताना दिसताहेत. त्यांच्या भूमिका बदलल्या नसल्या तरी त्याच्या नेत्यांची अदलाबदल झाल्याचे चित्र दिसते आहे. नुकताच माजी उपनगराध्यक्ष आर्विन सुवारिस, कुर्टी खांडेपारचे माजी पंच मगोपचे नारायण नाईक यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून वेरेकरांच्या प्रचारात झोकून दिले आहे.

फोंडा नगरपालिकेत चालेलल्या संगीत खुर्चीबाबत नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसतात, हे मात्र खरे. मगोपतर्फे डॉ. केतन भाटीकर, फोंड्याचे मगोपचे नगरसेवक तसेच कुर्टी खांडेपारचे पंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांबरोबर प्रचार करताना दिसताहेत. त्यांच्या गोटातही कार्यकर्त्यांची ‘देवाणघेवाण’ सुरू असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच फोंड्याचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र शिंक्रे हे मगोपच्या छावणीत दाखल झाले असून ते डॉ. भाटीकरांच्या प्रचारात सक्रिय आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले संदीप खांडेपारकर अपक्ष निवडणूक लढवत असून त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पूर्वीचे सरपंच असल्यामुळे तसेच त्यांच्या पत्नी या पंच असल्यामुळे त्यांना कुर्टी खांडेपार भागात प्रतिसाद लाभत आहे. ते जरी भाजपचे असले तरी त्यांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे ते भाजपबरोबर कॉंग्रेस, मगोपलाही फटका देऊ शकतात.

आपतर्फे अॅड. सुरेल तिळवे व आरजी तर्फे सानिश तिळवे हे रिंगणात असले तरी ते किती प्रभावी ठरतात हे पाहावे लागेल. एकंदर एका बाजूला रवी नाईकांचा प्रदीर्घ अनुभव तर दुसऱ्या बाजूला इतर उमेदवारांचा ‘जोश’ यांच्यामध्ये नेमके काय होणार, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

इसकी टोपी उसके सर !

रवींची भूमिका बदलल्यामुळे सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही भूमिका बदलल्यासारख्या वाटताहेत.अनेक कार्यकर्ते ‘आज इधर,तो कल उधर’ असे फिरताना दिसताहेत. त्यामुळे निवडणुकीपर्यंत परिस्थितीत काय बदल होईल हे सांगणे कठीण आहे. ‘इसकी टोपी उसके सर’ असा प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसायला लागला आहे. हे पाहता हे कार्यकर्ते मतदान नेमके कोणाला करतील हे सांगणे कठीण आहे. कोणी कोणाला ‘शेंडी’ लावली याबाबतही फोंड्यात चर्चा रंगताना दिसत आहे.

सायलंट व्होटर्स महत्त्वाचे !

खांडेपार भागात भाजपची तीन हजारांपैकी सव्वा दोन हजार मते भाजपची असून ती आता कोठे वळतात ते बघावे लागेल. त्याचप्रमाणे फोंड्यात असलेले बिगर गोमंतकीय हे ही राजकारणाची दिशा ठरवू शकतात. हे मतदार ‘सायलंट व्होटर्स’ म्हणून ओळखले जात असल्यामुळे त्यांचा कल नेमका कोठे आहे हे समजणे कठीण जाते. पण तेच निवडणुकीत निर्णायक भूमिका घेतील एवढे निश्चित. सध्या फोंड्यात चौरंगी लढतीचे नगारे वाजत असून ५०० ते १००० चा फरकच कोण विजयाच्या ‘मखरात’ बसणार हे ठरविणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT