Garbage Awareness  Gomantak Digital Team
गोवा

Garbage awareness : फोंडा शहरात कचराप्रश्नी जागृती मोहीम...

कचरा गोळा करणाऱ्यांचा सन्मान : नगरपालिका व हिलदारी प्रकल्पाद्वारे उपक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Garbage awareness : फोंड्यात कचरा जागृती मोहीम राबवण्यात आली. आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या शुक्रवारी फोंडा पालिका व हिलदारी प्रकल्पातर्फे हा कार्यक्रम झाला. यावेळी कचऱ्याप्रती जागृती राखणाऱ्या व कचरा गोळा करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रोबस क्लबचे अध्यक्ष अशोक तरळे, खास निमंत्रित नारी शक्तीच्या अध्यक्ष अनिता कवळेकर, प्रोबस ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे, संयोजक तथा माजी अध्यक्ष जयवंत आडपईकर आदी उपस्थित होते.

व्यासपीठावरील इतर मान्यवरांत पालिकेचे अभियंता राजेश फडते, पर्यवेक्षक सर्वेश नाईक, विजय आचार्य, प्रवीण नाईक हिलदारी संस्थेचे अधिकारी सिद्धार्थ पवार, विजय राठोड, सुमाली उनउने, श्रद्धा सालेलकर आदींचा समावेश होता.

अशोक तरळे यांनी कचरा गोळा करणाऱ्यांमुळे शहर आणि परिसर स्वच्छ राहत असल्याने या लोकांचे काम उल्लेखनीय असल्याचे नमूद केले. जयवंत आडपईकर यांनी आपले विचार व्यक्त करताना अशा लोकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे असे नमूद केले.

कचरा गोळा करणाऱ्यांच्या पाल्यांना शालेय उपयोगी साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. अनिता कवळेकर, सिद्धेश नाईक यांनीही आपले विचार व्यक्त केले. स्वागत सिद्धार्थ पवार यांनी, विजय राठोड यांनी प्रास्ताविक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: आजपासून गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT