Ritesh Naik Dainik Gomantak
गोवा

Ritesh Naik: रितेश नाईकांनी फोडला प्रचाराचा नारळ! मतदारांशी साधला संवाद; दळवींचे डोळे मुख्यमंत्र्यांकडे

Ponda By Election: रितेश नाईक यांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे, तर तिकडे भाजपचेच एक नेते विश्‍वनाथ दळवी यांंनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे जाहीर केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: भाजपने विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने निराश झालेल्या विश्वनाथ दळवी यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यात आल्यावर त्यांच्याशी बोलून यापुढे असे होणार नाही, अशी हमी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मात्र, ‘यापुढे म्हणजे केव्हा’ यावरून सत्ताधारी तंबूतच मोठी चर्चा रंगली आहे. २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कदाचित ती डिसेंबरमध्येही होईल, असे बोलले जाते.

त्यावेळी फोंड्याच्या उमेदवारीवर आपलाच अधिकार असेल, अशी हमी दळवी यांना हवी असेल, अशीही चर्चा सुरू आहे. ‘मुख्यमंत्र्यांशीच बोलेन’ असे सांगून त्यांची मनधरणी करण्यासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर आदींच्या शब्दाला आपण किती मान देतो, हेही दळवी यांनी नकळत दाखवून दिले आहे.

प्रचाराला दिमाखात प्रारंभ

फोंड्यातील पालिका क्षेत्रातून शुक्रवारी भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांनी दमदार प्रचाराला प्रारंभ केला. प्रचाराच्या शुभारंभी माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर तसेच भाजपचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इकडे रितेश नाईक यांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे, तर तिकडे भाजपचेच एक नेते विश्‍वनाथ दळवी यांंनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे जाहीर केले आहे.

सकाळी रितेश नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कुरतरकरनगरी, शांतीनगर भागात जोरात प्रचार केला. सर्वसामान्य मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांशी रितेश यांंनी संवाद साधला. युवा मतदारांना सोबत घेऊन जाण्याचा निर्धार रितेश यांनी केला असून आपल्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रचारादरम्यान नरेंद्र सावईकर, विद्या वृद्धी शिक्षण संस्थेचे संचालक उदय डांगी तसेच नगरसेवक आनंद नाईक, रूपक देसाई यांच्यासह इतर नगरसेवक आणि भाजप नेत्यांनी रितेश यांना साथ दिली. उदय डांगी यांनी मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे नमूद केले.

दरम्यान, सोमवार, २३ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून याच दिवशी सर्व उमेदवार आपली उमेदवारी दाखल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT