Ponda By Election Dainik Gomantak
गोवा

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

Ponda By Election 2026: फोंड्याचा गड जिंकण्‍यासाठी मुख्‍यमंत्री सावंत, तर हा गड भाजपच्‍या हातातून हिसकावून घेण्‍यासाठी काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर रविवारपासून थेट मैदानात उतरले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा/पणजी: फोंड्याचा गड जिंकण्‍यासाठी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तर हा गड भाजपच्‍या हातातून हिसकावून घेण्‍यासाठी काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर रविवारपासून थेट मैदानात उतरले आहेत. फोंडा पोटनिवडणुकीत परप्रांतीयांची मते निर्णायक ठरणार असल्‍याने मुख्‍यमंत्र्यांनी अशा मतांवर लक्ष केंद्रीत केले असून, त्‍यासाठी त्‍यांनी विविध राज्‍यांतून गोव्‍यात स्‍थायिक झालेल्‍या नागरिकांच्‍या कोपरा बैठका घेण्‍यास सुरुवात केली आहे.

माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांचे काही महिन्‍यांपूर्वी निधन झाल्‍याने फोंड्यात ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने रवींचे ज्‍येष्‍ठ सुपुत्र रितेश नाईक, काँग्रेसने डॉ. केतन भाटीकर, तर ‘आप’ने गीतेश नाईक यांना उमेदवारी दिली असून, या तिन्‍ही उमेदवारांचा पक्षांच्‍या वरिष्‍ठांकडून प्रचारही सुरू झाला आहे.

२०२२ मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपच्‍या उमेदवारीवर निवडणूक लढविलेले रवी नाईक मगोपच्‍या केतन भाटीकर यांच्‍याविरोधात अवघ्‍या ७७ मतांनी निवडून आले होते. त्‍यावेळी परप्रांतीय मतदारांची भूमिका निर्णायक राहिली होती. त्‍यामुळे भाजपने यंदा रितेश यांना अधिकाधिक परप्रांतीय मते मिळवून देण्‍यावर भर दिला आहे.

फोंडाही ‘स्मार्ट सिटी’ बनविणार

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी फोंड्यात जाऊन गुजराती आणि राजस्‍थानी नागरिकांच्‍या कोपरा बैठका घेतल्‍या आणि पणजीच्या धर्तीवर सरकारला फोंड्यालाही स्मार्ट सिटी बनवायचे आहे. त्यासाठी भाजपच्‍या रितेश नाईक यांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी त्‍यांच्‍यासोबत रितेश यांच्‍यासह माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, विनोद पटेल, मनू पटेल, बाबूलाल, भारत पुरोहित आदी उपस्थित होते.

पाटकरांचा दुचाकीवरून प्रचार

काही दिवसांपूर्वी मगोपतून काँग्रेसमध्ये आलेले डॉ. केतन भाटीकर यांना उमेदवारी देत काँग्रेसने त्‍यांचा प्रचारही सुरू केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी रविवारी भाटीकर यांच्‍या प्रचारात भाग घेतला. भाटीकर यांच्‍यासह दुचाकीवरून फिरत पाटकर यांनी घरोघरी भेटी देत त्‍यांचा प्रचार केला. फोंडा पोटनिवडणुकीत भाटीकरच जिंकून येतील, असा ठाम विश्‍‍वास असल्‍याने भाजपवर दबाव निर्माण झाला आहे, असा दावा पाटकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

SCROLL FOR NEXT