Ponda by election Dainik Gomatnak
गोवा

Ponda By Election: फोंड्यात रणधुमाळी! ‘मगो’ कार्यकर्त्यांना वळवण्‍यासाठी भाजपकडून रणनीती आखणी सुरू; प्रचारास येणार गती

Ponda Politics: फोंडा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रितेश नाईक, काँग्रेसकडून केतन भाटीकर आणि आम आदमी पक्षाकडून गीतेश नाईक यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फोंडा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रितेश नाईक, काँग्रेसकडून केतन भाटीकर आणि आम आदमी पक्षाकडून गीतेश नाईक यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्‍यामुळे मंगळवारपासून त्‍यांच्‍या प्रचाराला गती मिळणार आहे.

अशा स्‍थितीत मगोचे फोंड्यातील कार्यकर्ते भाटीकर यांच्‍या बाजूने उभे असल्‍याचे चित्र असल्‍याने त्‍यांची मते वळवण्‍यासाठी भाजपने रणनिती आखण्‍यास सुरुवात केल्‍याची माहिती सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांच्‍या निधनामुळे विधानसभेच्‍या फोंडा मतदारसंघात येत्‍या ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. राज्‍य विधानसभेची निवडणूक अवघ्‍या ११ महिन्‍यांवर येऊन ठेपलेली असल्‍यामुळे फोंडा पोटनिवडणुकीस अधिक महत्त्‍व प्राप्‍त झाले असून, सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस आणि ‘आप’ने ही निवडणूक प्रतिष्‍ठेची बनवली आहे.

भाजपने अपेक्षेनुसार रवींचे ज्‍येष्‍ठ सुपूत्र रितेश नाईक यांना उमेदवारी बहाल केली. तर, भाजपसोबत युतीत असलेल्‍या मगो पक्षाने सुरुवातीपासूनच रितेश नाईक यांना पाठिंबा जाहीर केल्‍याने निराश झालेल्‍या केतन भाटीकर यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळवली.

२०२२च्या विधानसभा निवडणुकीत भाटीकरांचा अवघ्‍या ७७ मतांनी पराभव झालेला होता. त्‍यामुळे पोटनिवडणुकीत भाजप–मगो युतीने भाटीकर यांनाच उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा ‘मगो’च्‍या बहुतांशी कार्यकर्त्यांना होती.

‘मगो’नेच रितेश यांना पसंती दिल्‍याने निराश कार्यकर्ते भाटीकर यांच्‍या पाठिशी उभे राहणार असल्‍याचे चित्र दिसत आहे. तसे झाल्‍यास रितेश यांना फटका बसू नये, यासाठी भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी मंत्री सुदिन ढवळीकर व इतर ज्‍येष्‍ठ नेत्‍यांना सोबत घेऊन ‘मगो’च्‍या मतदारांना भाजपकडे वळवण्‍याची रणनिती आखणे सुरू केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

‘ते’ सुदिनसोबतच राहणार

‘मगो’च्‍या फोंड्यातील काही कार्यकर्त्यांना मंत्री सुदिन ढवळीकर जवळचे आहेत. त्‍यामुळे निवडणुकीत ते रितेश यांच्‍या बाजूनेच ठाम राहतील. तर, केतन भाटीकर यांनी गेल्‍या काही वर्षांत जे कार्यकर्ते जोडले आहेत, ते मात्र त्‍यांच्‍या पाठिशी ठाम असल्‍याचेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

SCROLL FOR NEXT