Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Ponda Bus Stand: प्रवाशांच्या हितासाठी फोंडा बसस्थानक अद्ययावत करणार! वीजमंत्री ढवळीकरांचे आश्वासन

Sudin Dhavalikar: बांदोडा क्षेत्रात येणाऱ्या बसस्थानकावरील सुविधांनी युक्त स्वच्छतागृहाचे उद्‌घाटन सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: फोंडा बसस्थानक अद्ययावत करण्याचा मानस असून त्यासाठी डिझाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रवासी तसेच बसवाल्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा खटाटोप असून प्रवाशांचे हित लक्षात घेऊनच या बसस्थानकाचे डिझाईन केले जाईल, असे मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

मडकई मतदारसंघातील बांदोडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या कदंब बसस्थानकावरील अद्ययावत सुविधांनी युक्त बांधलेल्या स्वच्छतागृहाचे उद्‌घाटन आज (शुक्रवारी) सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच रामचंद्र नाईक, स्थानिक पंचसदस्य सोनिया नाईक, पंचसदस्य वामन नाईक, विशांत नाईक, सुलभ इंटरनॅशनलचे सुशीलकुमार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर म्हणाले की, एखाद्या बसस्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना आवश्‍यक सुविधा या मिळायला हव्यात. त्यामुळे पुढील काळात हा बसस्थानक माझ्या स्वप्नातील असेल. गेल्या वर्षी या स्वच्छतागृहाची पायाभरणी करण्यात आली होती. एका वर्षात काम पूर्ण करून नियोजित वेळेत हे स्वच्छतागृह उपलब्ध करण्यात आल्याने आता नागरिकांची चांगली सोय होईल.

फोंडा बसस्थानक मध्यवर्ती भागात

राज्यात फोंडा बसस्थानक हे मध्यवर्ती भागात आहे. फोंडा, मडकई, प्रियोळ आणि शिरोडा मतदारसंघांसाठी हे बसस्थानक केंद्र बनले आहे. राज्यातून कुठेही जायचे असेल तर फोंडा हे मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने या बसस्थानकावर राज्य तसेच आंतरराज्य स्तरावरील प्रवासी बसगाड्या येतात. याशिवाय खासगी टूर ऑपरेटरही याच बसस्थानकावरून आपल्या गाड्या सोडत असतात.

६७ लाख रुपये खर्च...

अत्याधुनिक सुविधांनी युक्त बांधलेल्या या स्वच्छतागृहाला ६७ लाख रुपये खर्च आला आहे. एका वर्षात हे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. हे स्वच्छतागृह सुलभ इंटरनॅशनलच्या ताब्यात असून चांगली सेवा उपलब्ध केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT