Ketan Bhatikar, Ponda Election Dainik Gomantak
गोवा

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीत 'भाटीकर' सर्वांत श्रीमंत! प्रतिज्ञापत्रांतून तपशील उघड; वाचा इतर उमेदवारांची माहिती

Ponda bypoll candidate assets: निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, डॉ. केतन भाटीकर यांची एकूण मालमत्ता सुमारे ४.८८ कोटी इतकी असून, ते या तिघांमध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरतात.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून त्यांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला आहे. काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर, भाजपचे रितेश नाईक आणि आम आदमी पक्षाचे गीतेश नाईक हे प्रमुख उमेदवार रिंगणात असून, तिघांपैकी सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले ते डॉ. भाटिकर.

निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, डॉ. केतन भाटीकर यांची एकूण मालमत्ता सुमारे ४.८८ कोटी इतकी असून, ते या तिघांमध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरतात. त्यांच्याकडे सुमारे ३.८० कोटींची स्थावर मालमत्ता असून, जंगम मालमत्ता सुमारे १.०८ कोटी आहे.

तसेच त्यांच्यावर अंदाजे १.२८ कोटींचे कर्ज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची नोंद सुमारे १३.२५ लाख अशी आहे. भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांची एकूण मालमत्ता सुमारे १.५५ कोटी इतकी आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार स्थावर मालमत्ता नसून बँक ठेवी, गुंतवणूक आणि दागिने अशा जंगम मालमत्तेचा त्यात समावेश आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे १५.४६ लाख असल्याची नोंद करण्यात आली आहे.

रितेश नाईक १.५५ कोटींच्‍या मालमत्तेचे धनी

आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांची एकूण मालमत्ता सुमारे ७२ लाख इतकी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. त्यात जंगम मालमत्ता सुमारे ५३.९७ लाख असून स्थावर मालमत्तेत प्लॉटचा समावेश आहे. तसेच त्यांच्यावर सुमारे १८.३६ लाखांचे कर्ज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवारांच्या मालमत्तेची तुलना चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT