Gitesh Naik Dainik Gomantak
गोवा

Gitesh Naik: 'गीतेश'विरोधात अजामीनपात्र वॉरंट! चेक बाऊन्स प्रकरण; वारंवार गैरहजेरी पडली महागात

Gitesh Naik Ponda Election: ३० मार्च २०२६ रोजी झालेल्या सुनावणीवेळी तक्रारदारांच्या वतीने ॲड. ए. फर्नांडिस उपस्थित होते; मात्र संशयित गीतेश नाईक न्यायालयात हजर राहिले नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फोंडा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश गोकुळदास नाईक यांच्याविरुद्ध तीन वर्षे जुने प्रलंबित असलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात मेरशी येथील न्यायालयाने कठोर भूमिका घेत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

तक्रारदार श्‍‍यामसुंदर मिरजकर यांनी ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’च्या कलम १३८ अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. गीतेश नाईक यांचा हजेरीतून सवलत मिळवण्याचा अर्जही न्‍यायालयाने फेटाळून लावला आहे. ३० मार्च २०२६ रोजी झालेल्या सुनावणीवेळी तक्रारदारांच्या वतीने ॲड. ए. फर्नांडिस उपस्थित होते; मात्र संशयित गीतेश नाईक न्यायालयात हजर राहिले नाहीत.

याची दखल घेत न्यायालयाने तातडीने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, कार्यवाही संपल्यानंतर दुपारी १२ वाजता संशयित आरोपीच्या वकिलांनी सवलतीचा अर्ज सादर केला; मात्र तो उशिरा सादर करण्यात आल्याने न्यायालयाने तो स्वीकारण्यास नकार दिला.

८ एप्रिल २०२४ पासून न्‍यायालयात गैरहजर

संशयित गीतेश नाईक ८ एप्रिल २०२४ पासून न्यायालयात हजर नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. गैरहजेरीसाठी कोणतेही ठोस कारण अर्जात नमूद केलेले नव्हते. प्रकरण जुने असून संशयित आरोपीकडून ‘नियोजित अनुपस्थिती’ दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा कठोर निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे. त्या दिवशी गुन्ह्याचे स्वरूप वाचून दाखवण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

SCROLL FOR NEXT