Chorao Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Chorao Ferryboat: ..नदीत अचानक फेरीबोट पडली बंद! 2 तास खोळंबा; स्थानिक होड्यांच्या मदतीने प्रवाशांना आणले किनाऱ्यावर

Pomburpa Chorao Ferryboat: फेरीबोट वारंवार नादुरुस्त होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीही याच फेरीबोटीला तांत्रिक अडचणी आल्याचे सांगण्यात येते.

Sameer Panditrao

पणजी : पोंबुर्पा-चोडण जलमार्गावरील फेरीबोट सोमवारी अचानक नदीच्या मध्यभागी बंद पडल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. या फेरीबोटीत त्यावेळी जवळपास २० प्रवासी आणि दोन वाहने होती. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्यामुळे प्रवासी आणखी अधिक चिंतेत पडले. जवळपास दोन तास प्रवासी नदीच्या मध्यावर अडकून पडले होते.

स्थानिक ग्रामस्थांनी तत्परतेने मदत केली. होड्यांच्या सहाय्याने प्रवाशांना आणि मुलांना सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणण्यात आले. मात्र या बचाव कार्यासाठी बराच वेळ लागल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत होती.

फेरीबोट वारंवार नादुरुस्त होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीही याच फेरीबोटीला तांत्रिक अडचणी आल्याचे सांगण्यात येते. नियमित दुरुस्ती व देखभालीचा अभाव असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. पोंबुर्पा-चोडण हा जलमार्ग स्थानिकांसाठी महत्त्वाचा असून दररोज अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुस्थितीतील फेरीबोट उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे.

प्रवाशांचा जीव धोक्यात घालून अशा नादुरुस्त फेरीबोटी धावत्या ठेवणे गंभीर निष्काळजीपणा असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. वारंवार बिघाड होत असल्याने या फेरीबोटीची तातडीने तपासणी करून नवी फेरीबोट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT