Pollution of Pond in Fatorda Dainik Gomantak
गोवा

फातोर्ड्यात तलावात सांडपाणी सोडल्याने स्थानिक संतप्त

प्रशासनाने तातडीने संबंधित इमारत मालकावर कारवाई करण्याची रहिवाशांची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : तलावात अवैधरित्या सोडलेल्या सांडपाण्यामुळे फातोर्डा परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दामबाबाची तळी नावाचा तलाव रहिवासी भागाशेजारीच असून यात घाण पाणी सोडल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी तक्रारही दाखल केल्याची माहिती आहे. (Pollution of Pond in Fatorda News Updates)

फातोर्ड्यातील (Fatorda) हा तलाव खूप जुना म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र सांडपाणी सोडल्याने तलावाचं विद्रुपीकरण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने तलावामध्ये सांडपाणी सोडण्यावर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. या तलावाशेजारी असलेल्या इमारतीला अद्याप सांडपाण्याच्या पाईपलाईनचे कनेक्शन न मिळाल्याने इमारतीमधील सांडपाणी तलावात सोडलं जात असल्याचा आरोप होतो आहे.

फातोर्ड्यासारख्या परिसरात अशाप्रकारे तलावाचं (Lake) विद्रुपीकरण होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचंही बोललं जात आहे. तसंच हे पाणी प्राण्यांसाठीही पिण्यायोग्य नसल्याचं बोललं जात आहे. परिसरात तलावातील सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचं प्रमाण वाढल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. तातडीने प्रशासनाने या इमारतीच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गोवा राज्य प्रदूषण (Pollution) नियंत्रण मंडळाकडेही याबाबत तक्रार दाखल करण्यात येईल, असं स्थानिकांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT