Nilkanth Halarnkar vs Kiran Kandolkar Tivim Dainik Gomantak
गोवा

Tivim Political News: हळर्णकर-कांदोळकर आमनेसामने ; थिवीत आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले

Nilkanth Halarnkar vs Kiran Kandolkar Tivim: थिवी मतदारसंघातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. स्थानिक आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर आणि माजी आमदार किरण कांदोळकर यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: थिवी मतदारसंघातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. स्थानिक आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर आणि माजी आमदार किरण कांदोळकर यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर थेट टीका केल्याने आगामी काळात मतदारसंघातील राजकीय 'पारा' अधिक चढण्याची शक्यता आहे.

हळणकर यांनी किरण कांदोळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर जहरी टीका केली. अशा माणसाला थिवीतील मतदार कधीच निवडून देणार नाहीत, असेही ते म्हणाले. त्याआधी कांदोळकर यांनी सध्याचे आमदार 'फ्लाईट मोड'वर गेल्याची टीका करत, मतदारसंघात कोणतीही ठोस कामे झाली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला होता.

कांदोळकर यांनी आपण अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सत्तेत येणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ, असे स्पष्ट केले. तसेच थिवीतील जनतेला विकास हवा आहे. लोक मला निवडून देतील, कारण त्यांना आपली कामे मार्गी लागतील, असा विश्वास आहे. आरजीपी हा माझा विरोधक नसून सध्याचे मंत्री हळणकर हेच प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT