Devendra Fadnavis & Minister Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

राजकारण्यांची भेट वैयक्तिक कधीच नसते: देवेंद्र फडणवीस

असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पर्रात सांगितले.

दैनिक गोमन्तक

शिवोली: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची भेट ही कधीच वैयक्तिक नसते जेव्हा दोन राजकारणी एकत्रित येतात तेव्हा ते राजकारणाच्याच गोष्टी करतात. आजची आपली मंत्री मायकल लोबोंच्या (Minister Michael Lobo) निवासस्थानी झालेली भेट ही सुद्धा येत्या विधानसभा निवडणुकी संबंधात उहापोह करण्यासाठी होती असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पर्रात सांगितले.

कळंगुटचे आमदार तथा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांच्या पर्रा येथील  निवासस्थानी फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात स्थानिक पत्रकारांशी बोलतांना  त्यांनी सांगितले. दरम्यान, पर्राच्या सरपंच तसेच आपल्या पत्नी  दिलायला लोबो या शिवोली मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत  याबाबतीत मी भाजपचा एक सदस्य असल्या कारणाने फडणवीस यांना कल्पना दिली आहे यांवर त्यांनी हसून योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्याचे मंत्री लोबो यांनी पत्रकारांना सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्रातील विळ्या भोपळ्याची युती गोव्यात कदापी होणे शक्य नसल्याचेही  फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात मंत्री लोबो यांच्याकडून बरीच गुप्तता बाळगळ्यात आली होती यावेळी ठरावीक पत्रकारांनाच आमंत्रित करण्यात आले होते......

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT