Assembly Election
Assembly Election Dainik Gomantak
गोवा

राज्यात करोनाचा कहर त्यात राजकीय नेत्यांची भर..

दैनिक गोमन्तक

गोवा: निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 14 फेब्रुवारीला राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. राज्यात राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. परिणामी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. (political Parties seen violating ECI norms in goa)

ECI ने दिलेल्या नियमावलीप्रमाणे केवळ पाच लोकांना घरोघरी प्रचारासाठी परवानगी आहे. परंतु, पेडणे व बार्देश तालुक्यातील शेकडो लोक त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक पक्षाच्या नेत्यांच्या घरोघरी जाऊन निवडणूक प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. रविवारी विविध राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांनी घरोघरी जाऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. त्यापैकी गोवा फॉरवर्ड पक्षाचे दीपक कलंगुटकर, काँग्रेसचे केदार नाईक, भाजपचे दयानंद मांद्रेकर यांनी देखील घरोघरी प्रचाराला सुरुवात केली.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) मार्गदर्शक सूचना

माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले की, 15 जानेवारीपर्यंत पाच राज्यांमध्ये रॅली, रोड शो आदींना परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला प्रत्यक्ष निवडणूक (Election) रॅली काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. पथसंचलनही करता येणार नाही. याशिवाय निवडणूक जिंकल्यानंतरही मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. घरोघरी प्रचारासाठी केवळ 5 जण जाऊ शकतात. 15 जानेवारीनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणूक आयोग निर्णय घेईल

अरविंद केजरीवाल यांची भूमिका कितपत योग्य?

आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले होते. कॉन्फरन्स दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रचार (Election Campaign) हा देशाची सेवा करण्याची एक संधी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. पुढील एक महिना देशाच्या नावावर करा. तुम्ही (कार्यकर्त्यांनी) घरोघरी जाऊन लोकांना या कामांबद्दल माहिती द्या. त्यांची विचारपूस करा. त्यांची मदत करा. सोशल मीडियाचा (Social Media) उपयोग करून लोकांपर्यंत पोहचा, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT