Court | Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News : साखळी प्रभाग आरक्षणात राजकीय हस्‍तक्षेप

न्यायालयात मागणार दाद

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळी पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणात राजकीय हस्तक्षेप करण्‍यात आला असून, त्याविरोधात न्यायालयात जाणार आहे, असे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी सांगितले.

आरक्षणाचा निकष योग्य पद्धतीने लावण्यात आलेला नाही. आपल्या मर्जीतील उमेदवारांचा मार्ग सोपा करण्यासाठी हे काटकारस्‍थान रचले आहे, असा आरोप त्यांनी केला.

प्रभाग क्र. २, ६ व १२ (महिला), प्रभाग १० (ओबीसी), प्रभाग ११ (महिला ओबीसी) वगळता उर्वरित सर्व प्रभाग खुले ठेवण्यात आले आहेत. या आरक्षणात दोन माजी व एका विद्यमान नगराध्यक्षाचा पत्ता कट करण्याचा डाव आहे.

प्रभाग ६ मध्ये राया पार्सेकर, प्रभाग ११ मध्ये धर्मेश सगलानी व प्रभाग १२ मध्ये राजेश सावळ यांचा पत्ता कट होत आहे. गेल्या निवडणुकीत प्रभाग ११ असलेला यावेळी १० आहे. तो प्रभाग गेल्या वेळी ओबीसी आरक्षित होता तर यावेळीही तो ओबीसी आरक्षित करण्यात आलेला आहे. म्हणजेच आपल्या खास लोकांना सांभाळण्यासाठी हे कारस्थान आहे, असा आरोप माजी सरपंच प्रवीण ब्लेगन यांनी केला.

प्रभाग फेररचनेला दिले आहे आव्हान

राज्य निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलेल्या प्रभाग फेररचनेला न्‍यायालयात आव्हान देण्‍यात आले आहे. प्रभाग फेररचनेत प्रत्येक प्रभागात मतदारांची संख्या समान राखण्यात आलेली नाही.

एका प्रभागात ४६७ मतदारसंख्या आहे तर इतर प्रभागांमध्ये ६०० ते ९०० पर्यंत मतदारसंख्या वाढविण्यात आलेली आहे. त्‍यास न्‍यायालयात आव्हान देण्‍यात आले आहे. आता आरक्षणाचाही मुद्दा न्यायालयात पोहोचणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतही गेल्यावेळी प्रमाणेच बरीच चुरस पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT