April Fool's Day : ...आणि ‘गोमन्तक’च्या कार्यालयातील फोन खणाणले; वेगळा प्रयोग

वाचकांकडून ‘एप्रिल फूल’ वृत्ताचे उत्स्फूर्त स्वागत; अनेकांना आश्चर्य, नंतर झाले मनोरंजन
Gomantak News paper
Gomantak News paperDainik Gomantak
Published on
Updated on

रोजच्या धकाधकीच्या जीवनात वाचकांना 1 एप्रिलच्या निमित्ताने काही तरी वेगळे देण्याचा दै. ‘गोमन्तक’ने केलेला उपक्रम वाचकांना भावला. पणजीतील स्मार्ट सिटी प्रकल्प व कोरोनाच्या सावटावरील स्थितीला अगदी तंतोतंत जुळणाऱ्या दै. ‘गोमन्तक’मधील वृत्ताने शहरासह राज्यातील नागरिकही अचंबित झाले.

‘पणजीत आजपासून लॉकडाऊन; महिन्यासाठी शहर राहणार बंद’ या मथळ्याखाली वृत्ताने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या वृत्तामुळे नागरिकांच्या मनात प्रथम आश्चर्याचा धक्का आणि नंतर आनंदाचे कारंजे फुटले.

Gomantak News paper
Goa Corona Update : धोका वाढला; दक्षतेचे आवाहन, एकूण बाधित 601

शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत ‘गोमन्तक’च्या कार्यालयातील फोन एकसारखे खणाणत होते. अनेकांनी खरेच आजपासून लॉकडाऊन आहे का? याची विचारणा केली, तर सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून खरेच सुट्टी आहे का? याची आनंदाने विचारणा केली.

पण हे वृत्त ‘एप्रिल फूल’ असल्याचे कळून चुकल्यावर ‘तुम्ही आमचे चांगलेच मनोरंजन केले’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पणजी शहरातील रस्ते गेल्या तीन महिन्यांपासून खोदल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याची सरकारने दखल घ्यावी व हे काम त्वरित पूर्ण करावे, या उद्देशाने ‘गोमन्तक’ने ही मनोरंजनात्मक बातमी प्रसिद्ध केली.

या बातमीचा जनमनावर तर प्रभाव पडलाच, शिवाय सरकारचेही डोळे उघडले. शनिवारी सकाळपासून वाहनांना पणजीत प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याच्या वृत्तामुळे अनेक वाहनचालकांना आता पणजीत कसे जायचे, असा प्रश्न पडला आणि त्यांनीही या वृत्ताबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण वस्तुस्थिती समजल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.

Gomantak News paper
Goa AAP : आमदार कार्लुस फेरेरा भाजपमध्ये दाखल होणार ?

‘त्या’ वृत्तातच होते उत्तर!

1 एप्रिलपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. त्यामुळे सकाळी शिक्षण खात्यात अनेक पालकांनी फोन करून ‘गोमन्तक’मधील ‘लॉकडाऊन’संदर्भातील बातमीविषयी विचारपूस केली.

जर आजपासून ‘लॉकडाऊन’ आहे, तर दहावीची परीक्षा कशी घेणार, असे विचारून पालकांनी शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांना भंडावून सोडले. त्यामुळे शिक्षण खात्यानेही ‘गोमन्तक’कडे या वृत्ताबद्दल विचारणा केली.

तेव्हा ‘‘गोमन्तक’ कार्यालयातून त्या वृत्ताबद्दलचे उत्तर त्या वृत्तातच आहे, ते वाचा’ असे सांगितल्यावर शिक्षण खात्यातील कर्मचारी जागे झाले. सर्व वृत्त वाचले असते तर त्यांची इतकी तारांबळ उडाली नसती.

"मला अनेकांचे बातमीची खातरजमा करण्यासाठी फोन आले. मराठीमधून लिहिणाऱ्या एका पत्रकारानेही मला फोन करून ‘गोमन्तक’च्या संपादकांना तुम्ही विचारत का नाहीत, असे संतापाने सांगितले. एकूण काय, तर पणजीतील अनेक रहिवासी या बातमीचीच चर्चा करताना दिसून आले."

किशोर शास्त्री, स्वीकृत नगरसेवक, पणजी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com