Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Vaibhav Sooryavanshi International t20 Debut vs England: आयर्लंडमधील खराब कामगिरीनंतर या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे बदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
Team India probable XI vs England
Team India probable XI vs EnglandDainik Gomantak
Published on
Updated on

Team India Playing XI: आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर, भारतीय संघ आता नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला अटीतटीचा सामना 1 जुलै रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिवरसाइड ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. आयर्लंडमधील खराब कामगिरीनंतर या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे बदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात सध्या सर्वात जास्त चर्चा 15 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची सुरु आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी20 सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसावे लागले, मात्र आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. वैभवला थेट सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या मोठ्या बदलाचा थेट फटका स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याला बसण्याची शक्यता आहे.

2026च्या टी20 विश्वचषकात 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरलेला संजू सॅमसन आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत दोन्ही सामन्यात सलामीला आला, परंतु तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. पहिल्या सामन्यात त्याने केवळ 5 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे सॅमसनला केवळ सलामीमधून वगळले जाणार की प्लेइंग इलेव्हन मधूनच पत्ता कट होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.

Team India probable XI vs England
IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

संजूने पहिल्या सामन्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती, तर दुसऱ्या सामन्यात ही भूमिका इशान किशनने (Ishan Kishan) पार पाडली. मात्र, इशान किशन देखील फलंदाजीत अपयशी ठरला असून त्याने दोन सामन्यांत अनुक्रमे 1 आणि 12 धावा केल्या. जर संघ व्यवस्थापनाला टॉप ऑर्डरमध्ये एकाच वेळी तीन डावखुरे फलंदाज खेळवणे टाळायचे असेल, तर संजू सॅमसनच्या जागी इशान किशनला संघाबाहेर बसावे लागू शकते आणि वैभवला संधी दिली जाऊ शकते. दुसरीकडे, सलामीवीर अभिषेक शर्माने आयर्लंडविरुद्ध 20 चेंडूत 49 धावांची वादळी खेळी खेळली असल्याने त्याचे स्थान पक्के मानले जात आहे.

Team India probable XI vs England
IND vs ENG Pitch Report: "वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?" ओपनर्सचा धमाका की स्विंगचा तडाखा; हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये टॉस ठरणार गेम चेंजर

गोलंदाजीत वेगवान आक्रमणात बदल होण्याची शक्यता कमी आहे, परंतु आयर्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या अष्टपैलू सूर्यांश शेडगेला बाहेर बसवून अनुभवी वॉशिंग्टन सुंदरला संघात परत आणले जाऊ शकते, कारण सूर्यांश पहिल्या सामन्यात छाप पाडू शकला नव्हता.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि प्रिन्स यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com