Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

लोबो दिल्लीत कशासाठी ? खरी कुजबूज

एक पाय भाजपात घालून बसलेल्या मायकल लोबो यांना दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या मेळाव्यात सहभागी होण्याची कसली दुर्बुद्धी झाली कळण्यास मार्ग नाही.

दैनिक गोमन्तक

लोबो कशासाठी दिल्लीत?

एक पाय भाजपात घालून बसलेल्या मायकल लोबो यांना दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या मेळाव्यात सहभागी होण्याची कसली दुर्बुद्धी झाली कळण्यास मार्ग नाही. काँग्रेसच्या महागाईविरोधी मेळाव्यात भाग घेण्यासाठी ते दिल्लीला गेले होते, परंतु काँग्रेसने त्यांना या मेळाव्यात सहभागी होण्यास मनाई केल्याचे खात्रीलायक वृत्त आमच्या हाती लागले आहे. या मेळाव्यासाठी खास प्रवेशिका देण्यात आल्या होत्या. लोबो यांच्याकडे ती प्रवेशिका नव्हती. लोबो यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना फोन करून आपली प्रवेशिका त्यांच्याकडे नाही ना, याची खातरजमा करून घेतली. दिल्लीतील नेत्यांनी दुसऱ्या बाजूला पाटकर यांना मायकल लोबो अजूनही विरोधी नेते आहेत का, अशी विचारणा केली. लोबो यांच्याविरोधात पक्षांतर विरोधी कायद्यान्वये अर्ज दाखल केल्याची माहिती पाटकर यांनी नेत्यांना दिल्यानंतर तर लोबो यांना मेळाव्यात सहभागी करून घेण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यामुळे नामुष्कीप्रत वातावरणात लोबो यांना घरी परतावे लागले. अमित शहा रविवारी अहमदाबाद व त्यानंतर मुंबईत होते, त्यामुळे लोबो त्यांना भेटण्याची शक्यता नव्हती. काँग्रेसमधील फुटीर गट पुढच्या चार-पाच दिवसांत भाजपमध्ये शिरणार असल्याचे नक्की होत असतानाच लोबो यांना कशासाठी काँग्रेस मेळाव्यात सहभागी होण्याची दुर्बुद्धी सुचली याची चर्चा गोव्यात चालू होती. ∙∙∙

(Political Gossip About Michael Lobo in Goa)

त्याला पाहिजे जातीचे..!

पक्षात फूट कशी पाडावी, याचा फारसा अनुभव दिगंबर कामत यांना नाही. मागच्यावेळी ते दिल्लीला गेले होते, तेव्हा अमित शहांनी त्यांना हिरवा कंदील दाखविला, परंतु कामत यांच्याकडे उर्वरित सात सदस्य कोठे होते? दिल्लीहूनच ते फोनाफोनी करायला लागले, तेव्हा बातमी बाहेर फुटली. यावर भाजपचे अनेक नेते म्हणतात कामत यांनी आम्हाला साधी कल्पना दिली असती, तर आम्ही एका रात्रीत आमदारांना उचलले असते. सतीश धोंड, सदानंद तानावडे अशी मंडळी भाजपात असताना आमदार सहज उचलता आले असते, असे त्यांना वाटते. रामनाथ कोविंद राष्ट्रपती निवडणुकीला उभे होते, त्यावेळी काँग्रेसची चार मते फुटली होती. पर्रीकर मुख्यमंत्री होते, परंतु आपल्या सरकारी बंगल्यावर न बसता आल्तिनोवरील एका कंत्राटदाराच्या बंगल्यात त्यांनी मुक्काम ठोकला व रात्री साडेदहा ते बारापर्यंत चार आमदारांना वेगवेगळे बंगल्यावर बोलाविले आणि तेथेच कट शिजला. पर्रीकरांकडे अशी धडाडी होती. आमदार फोडताना गुप्तता राखावी लागते, शिवाय वेगवान कृतीही आवश्‍यक असते. सध्या फुटू पाहणाऱ्या काँग्रेसमधील एकाही नेत्याकडे हे कौशल्य नाही आणि आवश्‍यक आक्रमकतेचाही अभाव आहे. केवळ पैसे उभे केले म्हणून आमदार फुटत नसतात. नाही म्हणायला सध्या आमदाराचा दर गोव्यात १५ कोटी असून, तोच दर महाराष्ट्रात २५ कोटी असल्याचे माहीतगारांचे म्हणणे आहे. ∙∙∙

कामत यांची दिल्लीवारी

काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने भाजपात प्रवेश करण्यास उत्सुक असलेले दिगंबर कामत सोमवारी सकाळी ८.२० च्या विमानाने दिल्लीला गेले होते. सोमवारीच रात्री ते गोव्याला परतले. तेथून त्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांना फोन केल्याचे वृत्त आहे. एल्टन डिकॉस्ता, संकल्प, रुडाल्फ व कार्लुस यांच्या संपर्कात ते आहेत. एल्टन यांना तर गेला महिनाभर कोण ना कोण सतत संपर्क करतो आहे. पणजीतील एक व्यक्ती तर नोटाने भरलेली बॅग घेऊन त्यांच्या घरी अवतीर्ण झाली होती, असे एल्टनचे निकटवर्तीय सांगतात. भाजपने काँग्रेसमध्ये फूट घालूनच भाजपात सामील व्हा असा कृती कार्यक्रम या नेत्यांपुढे ठेवला आहे. त्यामुळे राजीनामा देऊन फेरनिवडणूक घेण्याच्या फंदात कोणी पडणार नाही. भाजपला फेरनिवडणूक नको आहे. त्यामुळे देशभरात बभ्रा होतो व भाजपच या उचापतीमागे आहे, असा संदेश जातो. काँग्रेसचे नेते त्या पक्षाच्या निर्णायकीला कंटाळूनच पक्ष सोडत आहेत. असे वातावरण अमित शहा यांना देशभर निर्माण करायचे आहे. आठजणांचा गट तयार होत नव्हता, तेव्हा कामत आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार होते. आपल्या पुत्राला विधानसभेची उमेदवारी देऊन स्वतः केंद्रात जाण्याचे त्यांचे मनसुबे असल्याची चर्चा आहे. सध्या अमित शहा कामत यांच्यामागे भक्कमपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे कामतांना विरोध करणाऱ्यांची बोलतीच बंद झाली तर नवल ते काय... ∙∙∙

फोंडा पोलिसांचे बऱ्याच दिवसांनी कम बॅक!

वास्कोत भर दिवसा आणि तेही रस्त्यावर उमेश हरीजन नामक युवकाचा काहीजणांनी कोयता, सुऱ्याने भोसकून खून केला. खून केल्यानंतर या लोकांनी पळ काढला, पण पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत राज्यातील सर्वच पोलिस स्थानकांना अलर्ट केले. या खून प्रकरणातील दोन संशयित बाणस्तारीच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर फोंडा पोलिसांनी सापळा रचत त्यांना पकडलेही. एका अर्थाने खुनाच्या प्रकरणातील संशयितांना पकडण्याची फत्ते मोहीम फोंडा पोलिसांनी बऱ्यापैकी राबवली. त्यामुळे नक्कीच फोंडा पोलिसांचे अभिनंदन करायला हवे. आता गेले काही दिवस फोंड्यातील चोऱ्या, दरोडे यासारख्या गुन्ह्यांचा तपास काही लागलेला नाही. त्यामुळे वास्कोतील खून प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी फोंडा पोलिसांनी केलेली कामगिरी निश्‍चितच कौतुकास्पद आहे नाही का..! याचाच अर्थ फोंडा पोलिस देरसे आये लेकीन दुरुस्त आये, असेच म्हणावे लागेल ना...! ∙∙∙

मुख्यमंत्री ॲक्टिव्ह मोडवर

राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बेकायदेशीर वाळू उपसा आणि चिरे खाणीवर निर्बंध आणण्यासाठी मुख्यमंत्री सक्रिय झाले आहेत. यासाठीच त्यांनी सलग दोन दिवस राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन बेकायदा वाळू उपसा आणि चिरेखाणी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थात यासाठी वाळू उपसा करणाऱ्या निष्पाप कामगाराचा जीव जावा लागला हे मात्र स्पष्ट आहे. कारण अशा बेकायदा गोष्टी करणारे बाजूला राहतात. सरकार अशा बेकायदेशीर बाबींवर अगोदरपासून नियंत्रण का आणत नाही? हा प्रश्न आता सामान्यांना पडला आहे, जर राज्यातील वाळू उपसा या अगोदरच कायदेशीर मार्गाने केली असती, तर निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला नसता हे मात्र निश्चित. काही का असेना देर आयी, दुरुस्त आयी. ∙∙∙

पोलिसांपुढे आव्हान

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात गोवा पोलिसांच्या कार्यशैलीबाबत अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. आता हैदराबाद पोलिसांनी देखील गोवा पोलिस ड्रग्स माफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. गोवा पोलिसांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. परंतु यावरून वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. आता गोवा पोलिसांपुढे आपली विश्‍वासार्हता सिद्ध करण्याचे आव्हान आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT