Goa Assembly Elections Dainik Gomantak
गोवा

वेळ्ळीत चेहरे जुनेच, मात्र पक्ष बदललेले!

दैनिक गोमन्तक

कुंकळळी: सासष्टी तालुक्यातील आठ मतदारसंघापैकी एक असलेल्या वेळ्ळी मतदारसंघात तेच जुने चेहरे पुन्हा एकदा आमने सामने आलेले असून काँग्रेसचे सावियो डीसिल्वा व आरजीचे डेगली फेर्नांडिस हे दोन नवे चेहरे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.माजी आमदार बेंजामिन सिल्वा या वेळी तृणमूलच्या दोन फुलांवर आपले नशीब आजमावत आहेत.पेशाने अभियंते असलेले क्रूझ सिल्वा पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या झाडूच्या निशाणीवर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.(Political atmosphere in Goa on backdrop of Goa Assembly elections)

काँग्रेस Goa Congress पक्षाचा त्याग करून भाजपात एन्ट्री करून मंत्रिपद मिळविलेल्या फिलिप नेरी रॉड्रिग्स यांचे अजून ठरत नसून फिलिप नेरी Philip Neri यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर वेळ्ळी तून पुन्हा एकदा नशीब आजमविण्याचे ठरविले असल्याचे कळते.वेळळी पंचायतीचे सरपंच व कुटबण मासळी बोट मालक संघटनेचे माजी अध्यक्ष सावियो डिसिल्वा काँग्रेसच्या उमेदवारीवर मैदानात उतरणार आहेत.तर आरजी पक्षाने डेगली फेर्नांडिस यांच्या गळ्यात उमेदवारीची Candidate माळ घातली आहे.वेळळी मतदारसंघात Constituency विद्यमान आमदार व मंत्री फिलिप यांच्यापुढे एका माजी आमदारास चौघांनी कडवे आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात भाजपाचे अस्तित्व नावापुरतेच असून भाजपाच्या उमेदवारीवर

सावियो रॉड्रिग्स हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वेळ्ळी, आंबेली, असोळणा, चिंचोणे, सारजोरा, धर्मापुर, सांत जुझे दी आरियाल व रुमडामळ दवर्ली पंचायत क्षेत्रातील दोन प्रभाग मिळून सात पंचायत क्षेत्रातील मतदार पाच उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.

फिलिप नेरी यांच्या पुढे काँग्रेसचे उमेदवार सावियो डिसिल्वा यांनी कडवे आव्हान आहे.सावियो यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. 2012 च्या निवडणुकीत सेव्ह गोवा च्या उमेदवारीवर वेळळी मतदारसंघात निवडून आलेले व 2017 च्या निवडणुकीत फिलिप यांच्या विरोधात पराभूत झालेले माजी आमदार सिल्वा यांनी हल्लीच काँग्रेसमध्ये प्रवेशून काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला होता, मात्र काँग्रेसने तोंडाला पाने पुसल्यामुळे त्यांनी लगेच काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करून उमेदवारीही मिळविली.बेंजामिन सिल्वा यांना वेळळीचे मतदार आणखी एक संधी देणार का? आंतोनियो क्लोविस डी कोस्ता यांना डावलून बेंजामिन यांना तृणमूलने उमेदवारी दिली असली तर बेंजामिन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणार की पुन्हा एकदा 2017 ची पुनरावृत्ती होणार ,हे येणारा काळच ठरविणार आहे आम आदमी पक्षाचे उमेदवार क्रूझ सिल्वा हे सरळ व साधे व्यक्तिमत्व असून गेल्या निवडणुकीत त्यांनी बरी लढत दिली होती. सिल्वा यांनी आपचा झाडू घरोघरी पोहचवला असून त्यांना कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. आरजीचा आवाज या मतदारसंघात ऐकायला मिळत नसून आरजीचे उमेदवार डेगली फेर्नांडिस यांचा चेहराच पाहिला नसल्याचे मतदार सांगतात. फिलीप नेरींना पुन्हा संधी की,बेंजामिन यांना हे येणारा काळच ठरवेल.

फिलीप नेरींना राष्ट्रवादीचा आसरा ?

तीन वेळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले व पक्ष बदलू असा ठपका लागलेले विद्यमान आमदार फिलिप नेरी जरी भाजपात असले तरी तरी त्यांना भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यास भीती वाटते.वेळळीतील उमेदवार भाजपच्या कमळावर शिक्का मारणार नाहीत, हे माहीत असल्यामुळे ते सुरक्षित निशाणीच्या शोधात आहेत. अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरावे, की राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, हे जरी त्यांनी अजून ठरविले नसले तरी कार्यकर्त्यांच्या सागण्यांवरून राष्ट्रवादीकडे त्यांचा कल आहे.

महिला मतदारांची निर्णायक भूमिका

या मतदारसंघात मोठ्या संख्येने महिला मतदार असून पुरुष मतदारांच्या तुलनेत 1700 महिला मतदार जास्त आहेत शिवाय पुरुष मतदार कामानिमित्त जहाजावर व विदेशात असल्यामुळे महिलांचे मतदान अधिक होणार आहे, याचाच अर्थ ज्या उमेदवाराला महिला मतदार स्वीकारणार, तोच यशस्वी होणार यांत शंका नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT