Goa CM Dr. Pramod Sawant X Social Media
गोवा

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी CM सावंत यांचा मोठा निर्णय, गोव्यात आता भाड्याने राहणे झालं कठीण

Goa assembly monsoon session 2024: राज्यातील पोलिस स्थानकांना जोडणाऱ्या Visitor Connect मोबाईल App चा देखील वापर केला जाणार आहे.

Pramod Yadav

गोव्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर विधानसभेच्या अधिवेशनात चर्चा झाली. मायकल लोबो यांनी कांदोळी येथे झालेल्या खून प्रकरणांवरुन सभागृहात लक्षवेधी मांडली. यावर चर्चा करत असताना विविध आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडत अनेक उपाययोजनांची मागणी केली. यावर मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर देताना भाडेकरु पडताळणीसह सुरक्षात्मक उपायांची माहिती दिली.

गोव्यात आता राहणाऱ्या भाडेकरुंना पोलिस पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, घरमालकांनी पोलिस पडताळणी करुन घेणे आवश्यक असल्याचे सावंत सभागृहात उत्तर देताना म्हणाले. याबाबत त्यांनी सर्व गोमंतकीयांना देखील भाडेकरु ठेवताना काळजी घेण्याचे आवाहन केले.

तसेच, राज्यातील पोलिस स्थानकांना जोडणाऱ्या Visitor Connect मोबाईल App चा देखील वापर केला जाणार असल्याचे, सावंत म्हणाले. याच्या माध्यमातून पोलिसांनी त्यांच्या परिक्षेत्रातील घटनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे, असे सावंत म्हणाले.

राज्यातील सार्वजनिक ठिकाणी (बस स्थानक, हॉटेल्स, सिंगनल्स) याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील आणि त्याचा पोलिस स्टेशनलाही कनेक्ट दिला जाईल असे, मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

राज्यात वाढणाऱ्या बाउन्सर्स क्लचरबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना सावंत यांनी सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या संस्थांना नोंदणी आवश्यक असल्याचे सांगितले.

याशिवाय गेल्या पाच वर्षात राज्यातील गुन्हे तपासणीचा दर चांगल्या पद्धतीने वाढल्याचे सांगितले. डिटेक्शन रेट ८७ टक्के असून, गुन्ह्यांच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे सावंत यांनी नमूद केले.

तसेच, गोव्यात चोवीस तास पोलिस कार्यरत असून, अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तसेच, रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग देखील केले जात असल्याचे सावंत यांनी उत्तरात सांगितले.

आमदार मायकल लोबो यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर दिलायाला लोबो, विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, विरेश बोरकर, वेंझी व्हिएगस, निलेश काब्राल, रुडॉल्फ फर्नांडिस, उल्हास तुयेकर, चंद्रकांत शेट्ये, जेनेफर मोन्सेरात, आंतोनियो वाझ आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मत मांडत काही सूचना केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कोट्यवधी खर्च केल्यानंतर 'कला अकादमी'ची अवस्था सुधारण्याऐवजी बिघडली कशी काय?

Goa Assembly Live: EHN योजनेमुळे 'अज्ञात' घरांना ओळख

Loliem: लोलयेवासीय गावाची 'अधोगती' पाहत राहतील की 'विरोध' करण्यास सज्ज होतील?

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

Damodar Saptah: ..पंढरीच्‍या वारकऱ्यांसाठी जशी विठूमाउली, तसा गोव्यातील भाविकांसाठी दामबाब! आख्‍यायिकांनी भरलेला 'देव दामोदर'

SCROLL FOR NEXT