अखेर डिकॉस्तांनी माफी मागितली नाहीच पण सीएमनी हक्कभंगाचा विषय मिटवला, सभागृहात नेमकं काय घडलं?
CM Pramod SawantS Social Media

अखेर डिकॉस्तांनी माफी मागितली नाहीच पण सीएमनी हक्कभंगाचा विषय मिटवला, सभागृहात नेमकं काय घडलं?

Goa assembly monsoon session 2024: विरोधी पक्षनेते आलेमाव आणि आमदार सरदेसाई यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी विषयावर पडदा पडल्याचे जाहीर केले.
Published on

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर एल्टन डिकॉस्ता यांच्याविरोधातील हक्कभंगाचा विषय संपवत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

सत्ताधारी माफीच्या मागणीवर ठाम राहिल्याने दुसऱ्या दिवशी देखील दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यावेळी देखील प्रश्नोत्तराचा तास वाया जातो अशी शक्यता निर्माण झाली असताना मुख्यमंत्री सावंत यांनी विषय संपल्याचे जाहीर केले.

काय म्हणाले विरोधी पक्षनेते आलेमाव?

एल्टन यांनी सभापतींबाबत त्यांना आदर असल्याचे सांगितले. तसेच, सभापती पदाचा अनादर करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असेही स्पष्ट केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पुढे जावे या दृष्टीने तुम्ही याबाबत योग्य निर्णय घ्यावा असे, आलेमाव म्हणाले.

विजय सरदेसाई काय म्हणाले?

आमदार एल्टन तुमचा शेजारी आहे, त्यांच्या तुमच्याप्रती आदर आहे. दोघेही एसटी समाजासाठी काम करतायेत. तसेच, मॉबच्या मताने निर्णय घेतला जाऊ नये आणि चुकीचे प्रथा पडू नये यासाठी हा विषय विसरुन पुढे जाऊया, असे विजय सरदेसाई म्हणाले.

अखेर डिकॉस्तांनी माफी मागितली नाहीच पण सीएमनी हक्कभंगाचा विषय मिटवला, सभागृहात नेमकं काय घडलं?
'ना एल्टन ना मुख्यमंत्री, कोणीच मागे हटेने'; हक्कभंगावरुन दुसऱ्या दिवशीही दोनवेळा कामकाज तहकूब

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'हा विषय इथेच संपला'

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विजय सरदेसाई आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे मत विचारात घेऊन हा विषय इथेच संपला, असे जाहीर करतो, असे सांगितले. आम्ही संख्येने जास्त आहोत म्हणून कोणाला माफी मागण्यास भाग पाडण्याचा आमचा उद्देश नाही.

पण, सभापतींचा अनादर कोणी करुच नये हा संदेश लोकांपर्यंत जाणे फार गरजेचे आहे. लोकांचे विषय समस्या सभागृहात मांडल्या जाव्यात यासाठीच अधिवेशन १८ दिवस ठेवल्याचेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com