police  Dainik Gomantak
गोवा

आपेव्हाळ - प्रियोळमध्ये चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिस सक्रिय

फोंड्यात 21 पैकी 16 चोऱ्यांचा तपास पुर्ण

दैनिक गोमन्तक

फोंडा: आपेव्हाळ-प्रियोळ येथील भुरट्या चोऱ्यांप्रकरणी स्थानिकांनी फोंडा पोलिसांना निवेदन दिल्यानंतर फोंडा पोलिसांनी त्वरित दखल घेत या भागातील भुरट्या चोरट्यांना पकडण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. रात्रीच्यावेळी भुरट्या चोरट्यांकडून चोरीचे प्रकार सुरु असल्याने या ठिकाणी पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी स्थानिकांनी केली होती, त्याला अनुसरून सध्या पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील 21 पैकी 16 चोऱ्यांचा तपास फोंडा पोलिसांनी लावला आहे. ( Police system activated in Priol to deal with thieves )

दिवसा तसेच रात्रीच्यावेळी या भागात म्हार्दोळ, फर्मागुढी पोलिस आऊट पोस्ट तसेच पोलिसांच्या पीसीआर व्हॅनला वरिष्ठ पोलिसांनी आदेश दिल्याप्रमाणे सध्या या भागात गस्त सुरू आहे. नागरिकांनी पोलिसांनाही तेवढेच सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या भागात राहणाऱ्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती मिळवण्यात येत आहे. भुरट्या चोऱ्यांत बाहेरील लोकांचा हात आहे काय, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता त्यासंबंधी चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रियोळ, आपेव्हाळबरोबरच फोंडा भागातील भाडेकरुंची माहिती गोळा करण्यात येत आहे.

याशिवाय स्क्रॅप यार्डांवरही चौकशी सुरू असून चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी शापूर - फोंडा येथील दोन गटातील राड्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी पाचजणांना त्वरित अटक करून याप्रकरणी दहशत माजवणाऱ्यांना जरब बसवली आहे.

फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या 21 पैकी 16 चोऱ्यांचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. पाच चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, फोंडा पोलिस स्थानकात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे तपासकामावर परिणाम होत आहे. त्यामुळे पुरेसा कर्मचारी वर्ग फोंडा पोलिस स्थानकाला देण्याची आवश्‍यकता आहे. असे मत यावेळी पोलीसांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT