Arambol beach costume party Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2023: हरमलमध्ये विदेशींच्या कार्निव्हलचा प्रयत्न रोखला

म्होरक्या जुजूसह चौघे ताब्यात; 20 वर्षानंतर प्रथमच उत्सव रद्द

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Carnival 2023: येथील किनारी भागात विदेशी पर्यटक कार्निव्हल मूडमध्ये असल्याचे पाहून, विनापरवाना पर्यायी कार्निव्हल सुरू करण्याचा जुजू (जर्मनी) याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत व सहकाऱ्यांनी हाणून पाडला.

या कारवाईत म्होरक्या जुजू (जर्मनी) यास रेस्टॉरंटच्या तीन कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी 'वॅटस् इन' रेस्टॉरंटमधून ताब्यात घेतले. 20 वर्षांनंतर अशी कारवाई झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले तसेच किनाऱ्यारील लमाणींचा वावर वाढला असून, पर्यटकांना धमकावून व्यवहार केले जात असल्याने कारवाईची अपेक्षा स्थानिक बाळगून आहेत.

सदर कार्निव्हल 3 वाजता सुरू होणार असल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने विदेशी पर्यटकांनी ये-जा सुरू केली होती. मात्र, परवाना न मिळाल्याने काहींनी मोरजी भागात जाण्याचे ठरवले तर काहींनी हरमलात थांबणे पसंत केले. यावेळी रेस्टॉरंटसमोर मोठाले पक्षी, गरुड व फुले तसेच विविध वस्तू केल्या होत्या. या कारवाईमुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.

पोलिसांना गृहीच धरु नये!

राज्य सरकारचा कार्निव्हल मोरजीत चालू असून त्यास पर्यायी कार्निव्हल हरमलमध्ये घेणे कायद्याचे उल्लंघन असून उशिरा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास काळजी म्हणून जुजू (जर्मनी) यास ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक राऊत यांनी सांगितले.

यावेळी रेस्टॉरंटबाहेर मोठा थाट केला होता व त्यांचा सुगावा लागल्याने कारवाई केल्याचे पोलिस निरीक्षक राऊत यांनी सांगितले. दरम्यान, विदेशी पर्यटकांना पाठिंबा देणाऱ्या मंडळींनी पोलिसांना गृहित धरू नये, स्थानिकांच्या पाठिंब्यामुळे विदेशी शेफारले असून, पोलिसांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन निरीक्षक राऊत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT