Goa Police : गोव्यात उघड्यावर दारुचे सेवन करणाऱ्या तळीरामांना पोलिसांचा इशारा

गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास बंदी आहे
Police taking action on alcoholics
Police taking action on alcoholicsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police : गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास बंदी आहे. मात्र, केवळ पणजीतच नव्हे तर अनेक ठिकाणी लोक खुल्यावर दारुचे सेवन करीत असल्याचे चित्र दिसून येते. उत्तर गोवा पोलिसांकडे यांसदर्भात तक्रारी वाढल्या होत्या.

पोलिसांनी पर्यटनस्थळी तसेच निर्जनस्थळी रात्रीच्या वेळी अवैधरित्या उघड्यावर दारु पिणाऱ्या पर्यटक तसेच नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी आखली आहे.

Police taking action on alcoholics
गोव्यात अमली पदार्थांची निर्मिती? का वाढली राज्यात तस्करी? पोलीस अधीक्षक म्हणतात, येथे फक्त...

त्यानुसार सोमवारी पोलिसांनी पणजी येथील आयनॉक्स समोरील मांडवी तीरावर दारुचे सेवन करणाऱ्यांना तेथून हटवले व त्यांना याठिकाणी दारुचे सेवन करु नये अशी ताकीदही दिली. यावेळी खुल्यावर मद्यपान करताना अचानक पोलिस आल्याचे पाहून अनेकांची पळ ठोकली.

दारुचे सेवन करताना कुणी आढळल्यास पोलिस ताब्यात घेण्याबरोबरच दंडही ठोठावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खुल्यावर दारुचे सेवन करणे टाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Police taking action on alcoholics
Aguada Fort : ऐतिहासिक किल्ल्यावरील ते मद्याचे दुकान अखेर हटविले

याबाबत उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले, पणजीतील मांडवी तीरावर खुल्यावर संध्याकाळच्या वेळी आता पोलिसांची गस्त वाढवली जाईल. पोलिस अधिकारी या स्थितीवर लक्ष ठेवून असतील. सार्वजनिक ठिकाणी दारुचे सेवन करण्यावर बंदी असल्याने अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. नागरिकांनी सुध्दा कायद्याचे पालन करावे तसेच सार्वजनिक जागांचे पावित्र राखावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com