CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये

हणजूण येथे बेकायदा मसाज पार्लरवर धडक कारवाई

दैनिक गोमन्तक

शिवोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी किनारी भागातील बेकायदा मसाज पार्लरवर सक्त कारवाईचे पोलिसांना निर्देश देत सोमवारपासून कारवाई सुरू होईल असे सांगितले. त्यानूसार सोमवारी सकाळी म्हापसा उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी डिमेलोवाडा-हणजूण येथे गेली चार वर्षे कार्यरत असलेल्या होली-बासील या बेकायदा मसाज पार्लरवर कारवाई केली.

पोलिसांनी छापा टाकून अवैध पार्लरमधून अवैध तेलाच्या बाटल्या, रजिस्टर तसेच विविध प्रकारच्या मसाजसाठी वापरात येत असलेले अन्य साहित्य जप्त केले. पार्लरवाल्यांकडे आरोग्य खाते, पंचायत तसेच अन्य कुठल्याच प्रकारचा वैध दाखला नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी पार्लरचा व्यवस्थापक आरोक्यियाराज कुलियान थायसू (रा.थिरुवन्नामल्लाय, तामिळनाडू) याला ताब्यात घेत विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला.

डिमेलोवाडा-हणजूण येथे स्थानिक पंचायत आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून गेली चार वर्षे होली-बासील हे अवैध मसाज पार्लर सुरू होते. म्हापसाचे उपअधिक्षक जीवबा दळवी यांनी हणजुण पोलिस स्थांनकाचा हंगामी ताबा घेतलेले विक्रम नाईक व पोलिस पथकाच्या सहकार्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT