Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 23 वर्षीय युवक ‘ड्रग्स पॅडलर’! सत्तरीतील बारवर छापा; 631 ग्रॅम गांजा ताब्यात

Goa Drug Raid: अभय रामा गावकर (वय २३ वर्षे, रा. पोस्तवाडा-होंडा) असे या युवकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याकडे ६३१ ग्रॅम गांजा होता.

Sameer Panditrao

वाळपई: राज्यात किनारी भागात चालणारे ड्रग्स व्यवसायाचे लोण आता ग्रामीण भागांमध्येही पसरल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. कुंभारखण-सत्तरी येथील  एका बीअर बारवर पोलिसांनी छापा टाकून शुक्रवारी रात्री एका युवकाला गांजासह अटक केली.

अभय  रामा गावकर (वय २३ वर्षे, रा. पोस्तवाडा-होंडा) असे या युवकाचे नाव असून त्याच्यावर  गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याकडे ६३१ ग्रॅम गांजा होता. त्याची किंमत ६३,१०० रुपये आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोलिंग करताना वाळपई पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून कुंभारखण येथील ड्रग्स पॅडलर अभय याला त्याच्याच बारमध्ये गांजासह ताब्यात घेतले.

अभयला वाळपई पोलिसांनी शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले होते. मात्र, शनिवारी संध्याकाळी उशिरा  पोलिसांनी पंचनामा करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून  अटक केली.   याप्रकरणी वाळपई पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक  प्रथमेश  गावस पुढील तपास करत आहेत. 

अभय सराईत गुन्हेगार

अभय यालाही ड्रग्सचे व्यसन असून यापूर्वी ही त्याच्यावर वेगवेगळ्या पोलिस स्थानकांत गुन्हे दाखल झाले आहेत. जुने गोवे पोलिस ठाण्यातही त्याच्यासह दोन साथीदारांवर गुन्हा नोंद असून यासंबंधीचा खटला लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी ड्रग्सप्रकरणी त्याला सहा महिन्यांची शिक्षाही झाली आहे. 

वास्को-मडगावातून येतात ग्राहक

मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी ड्रग्स, गांजा यासारखे अमली पदार्थ सहजपणे उपलब्ध होत असल्याने येथे वास्को, मडगाव आणि इतर भागांमधील तरुण येत असल्याची माहिती मिळाली आहे. असे असूनही पोलिसांनी यापूर्वी कधी या बारवर छापा का टाकला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT