दाबोळी नवेवाडे बंद पडलेले पोलीस आऊट पोष्ट, बाजूस मुरगाव पालिकेचे कामगार कचरा काढताना. Dainik Gomantak
गोवा

जनतेची सेवा बजावणाऱ्या पोलिसांचे आउट पोस्ट कचऱ्याचा ढिगार्‍यात

अचानक पोलीस (Police) पोष्ट बंद करण्यात आले, ते आज पर्यंत सुरू झाले नसल्याने या भागातील नागरिकांनी (citizens) पुन्हा येथे पोष्ट सुरू करण्याची मागणी करीत आहेत.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: नवेवाडे भागातील नागरिकांच्या (citizens) सुरक्षेसाठी दाभोळीतील लोकप्रतिनिधीने मोठया दिमाखात पोलिस आउट पोस्ट सुरू केले होते. परंतु गेल्या तीन वर्षापासून प्रामाणिकपणे जनतेची सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या (Police) आउट पोस्ट कचऱ्याचा ढिगार्‍यात सापडला आहे. राज्य गृह विभागाने त्वरित या भागात पुन्हा एकदा पोलिस आऊट पोष्ट सुरू करण्याची करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी दाबोळीचे आम आदमी पक्षाचे नेते प्रेमानंद (बाबू) नानोस्कर (Premanand Nanoskar) यांनी केली.

दाभोळीचे लोकप्रतिनिधी फक्त जनतेला आश्वासन तेवढे देतात. जनतेची सेवा करण्यास मागे राहत असल्याची माहिती आपचे नेते बाबू नानोस्कर यांनी दिली. तीन वर्षापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधीने मोठा गाजावाजा करून नवेवाडे भागातील दाभोळी मतदारसंघात पोलीस आऊट पोष्ट सुरू केले होते. काही महिने आऊट पोष्ट मध्ये पोलिसांनी आपली सेवा बजावली. नंतर अचानक पोलीस पोष्ट बंद करण्यात आले, ते आज पर्यंत सुरू झाले नसल्याने या भागातील नागरिकांनी पुन्हा येथे पोष्ट सुरू करण्याची मागणी करीत असल्याची माहिती बाबू नानोस्कर यांनी दिली.

दाभोळीच्या लोकप्रतिनिधीने ज्या ठिकाणी पोलीस आऊट पोष्ट सुरू केले होते त्याच ठिकाणी मुरगाव पालिकेचे कचरा टाकण्याचे ठिकाण असल्याने तेथे सदैव कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. त्यामुळे पोलिसांना दररोज या कचऱ्यामुळे दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. तसेच बाजूस सार्वजनिक सुलभ शौचालय असल्याने पोलिसांना दुर्गंधीचा आणखीन त्रास होऊ लागल्याने कदाचित पोलीस आऊट पोष्ट बंद पडल्याची शक्यता या भागातील नागरिकांनी नागरिकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान आपचे नेते नानोस्कर यांनी राज्य गृह विभागाकडे (State Home Department) वाडे येथील पुन्हा पोलीस आऊट पोष्ट सुरू करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या आरोग्याची (health) काळजी घेऊन जनतेच्या सेवेसाठी नव्याने पोलीस आऊट पोष्ट सुरू करावे अशी मागणी नानोस्कर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT