Goa Dog Bite Dainik Gomantak
गोवा

Panaji News: धक्कादायक! पोलिस अधिकाऱ्याच्या कुत्र्याचा लष्करी अधिकाऱ्यास चावा; प्रकरणाची तीनदा चौकशी

तरीही न्याय न मिळाल्याने राज्य मानवाधिकार आयोगाकडे मागितली दाद : २९ रोजी सुनावणी; मुख्यमंत्र्यांकडेही मांडली कैफियत

दैनिक गोमन्तक

Goa Dog Bite News: एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा कुत्रा लष्करी अधिकाऱ्यास चावला. या प्रकरणाची तब्बल तीनवेळा चौकशी झाली. त्यात कुत्र्याचा काहीच दोष नसल्याचे सिद्ध झाल्याने आता अखेर त्या लष्‍करी अधिकाऱ्याने राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाद मागितली आहे. येत्या २९ जानेवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.

सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल जीजस फुर्तादो हे त्याचवेळी चालण्यासाठी आपल्या कुत्र्यासह निघालेले पोलिस अधिकारी बॉस्युएट सिल्वा यांना धडकले. त्यावेळी सिल्वा यांच्या कुत्र्याने फुर्तादो यांच्यावर धाव घेत चावा घेतला.

फुर्तादो यांच्या म्हणण्यानुसार, कुत्रा त्यावेळी मोकाट सोडला होता. या प्रकरणी पोलिसांत एफआयआर नोंदविला गेला नाही. त्यामुळे फुर्तादो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे जाऊन न्याय मागितला. फुर्तादो यांनी चौकशीत ४७ पानांचे पुरावे दिले. परंतु राज्याच्या मुख्य सचिवांच्या निर्देशांनंतरही चौकशी पूर्ण झालेली नाही.

कुत्र्याला भडकावल्याचा निष्कर्ष

मेघालयात राहणारे लेफ्टनंट कर्नल फुर्तादो यांनी दावा केला आहे की, यापूर्वी तीनदा केलेल्या चौकशीत पोलिस अधिकाऱ्याला निर्दोष घोषित केले आहे. कुत्र्याला फुर्तादो यांनी भडकावले, असेही तीनवेळा झालेल्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे न्याय न मिळाल्याने फुर्तादो यांनी गोवा मानवाधिकार आयोगाचे दरवाजे ठोठावले आहेत.

सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

या प्रकरणाची वाच्यता कोणी केली नव्हती. मात्र, लष्करी अधिकारी ईशान्येकडील राज्यात कामावर परतले आणि याचा भांडाफोड झाला. त्यांनी हे प्रकरण धसास लावण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पोलिस आणि लष्कर अशा दोन्ही वर्तुळांतून मानवाधिकार आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हे काय बोलून गेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री', भाजपमध्ये लवकरच भूकंप? सोशल मिडियावर रंगली चर्चा तर विरोधक म्हणाले, 'कामत खरं तेच बोलले

Nepal Protest Explained: जाळपोळ, दगडफेक करत नेपाळमध्ये लाखो तरूण रस्त्यावर का उतरलेत? सोशल मीडिया बंदी, भ्रष्टाचार आणि तेथील राजकारण समजून घ्या

Viral Video: मुर्खपणाचा कळस! रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपला, भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, पठ्ठ्याचा व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Goa Live Updates: मुरगाव पालिकेत भरतीवरुन गदारोळ; NSUI आणि सावियो कुतिन्हो यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव

हरमल किनाऱ्यावर आढळला परदेशी महिलेचा मृतदेह, बुडून मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस तपास सुरु

SCROLL FOR NEXT