Anjuna police arrest  Dainik Gomantak
गोवा

Anjuna : अमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांची करडी नजर; 45 हजारांच्या अमली पदार्थांसह एकाला अटक

हणजुण पोलिसांची कारवाई

Rajat Sawant

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) शुक्रवारी मध्यरात्री मोरजी -पेडणे परिसरात छापा टाकला. या छाप्यात नायजेरीयन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १.४० लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. अशीच एक अंमली पदार्थ विरोधी कारवाई हणजुण पोलिसांनी केली आहे.

हणजुण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली. या कारवाईत कर्नाटक येथील एका संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याचाकडून मेथिलीनडियोक्सी- मेथाएफेटामाइन हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्सची बाजारातील किंमत 45 हजार रुपये एवढी आहे. दर्शन मणी (24) रा. कोडगु, कर्नाटक असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. हणजुण पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

शुक्रवारी मध्यरात्री मोरजी -पेडणे परिसरात एएनसीने टाकलेल्या छाप्यात १.४० लाख रुपये किमतीचे ८ ग्रॅम एमडीएमए, ५ ग्रॅम एक्टसी पावडर आणि १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. अरिन्झे रॉबिन्सन (४०) असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: कोर्टात केस जिंकल्यावर भटक्या कुत्र्यांची गोव्यात पिकनिक; सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडिओ Watch

Ganesh Chaturthi Best Status: गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास 10 स्टेटस, Watch, Download, Share

Water Metro Goa: वॉटर मेट्रोमुळे 'पर्यटनाला' मिळणार चालना! मंत्री फळदेसाईंनी व्यक्त केली आशा; कोचीत जलमार्गावर केला प्रवास

High Court: 'गाय केवळ पूजनीयच नाही तर...', गोवंश तस्कराला हायकोर्टाचा झटका; नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण

Rohit Sharma Record: फक्त एक सामना आणि हिटमॅन 'रोहित' रचणार मोठा विक्रम; सामील होणार खास क्लबमध्ये

SCROLL FOR NEXT