Goa Government Decision: एससी, एसटी, ओबीसीतील मुलांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

समाज कल्याण खात्याने जारी केला आदेश
Directorate Of Social Welfare
Directorate Of Social WelfareDainik Gomantak
Published on
Updated on

एससी, एसटी आणि ओबीसींमधील घटस्फोटित, विधवा मातांच्या मुलांना आईचे जात प्रमाणपत्र मिळणार आहे. या निर्णयामुळे संबधितांना सरकारने दिलासा दिला आहे. याबाबतचा आदेश समाज कल्याण खात्याने जारी केला आहे.

Directorate Of Social Welfare
Goa Mining : गोवा सरकार लवकरच आणखी 40 खाण लीजचा लिलाव करणार ?

एससी, एसटी आणि ओबीसींमधील गरीब घटस्फोटित, विधवा अशा एकल मातांच्या मुलांना विविध कारणांमुळे वडिलांच्या जातीचा दाखला मिळू शकत नाही. आर्थिक स्थिती गरीब असल्याने मुलांना पुढील शिक्षण घेण्यात अडचणी येत होत्या. या अडचणी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक एकल मातांना दिलासा मिळणार आहे.

Directorate Of Social Welfare
Nepal : नेपाळमधील राजकारणांत उलथापालथ; प्रचंड यांनी पंतप्रधान होण्यासाठी मागितला 'या' नेत्याचा पाठिंबा

एकल मातांच्या मुलांना आईचे जात प्रमाणपत्र देण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांना असणार आहेत. तलाठी किंवा आपल्या इतर स्त्रोतांमार्फत हे अधिकारी संबंधित एकल मातेची आर्थिक स्थिती तसेच इतर आवश्यक बाबींची चौकशी करतील. त्यानंतरच त्यांच्या मुलांना आईचे जात प्रमाणपत्र दिले जाईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या एकल मातांच्या मुलांना आईचे जात प्रमाणपत्र मिळणार नाही.

एससी, एसटी, ओबीसी समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या एकल मातांच्या मुलांना आईच्या जातीचा दाखला देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयासह दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्रातील उच्च न्यायालयांनी दिलेल्या निवाड्यांनुसारच गोव्यातही हा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com