पणजी: कुडचडे येथे बेकायदा रेती उत्खनन प्रकरणातून झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या पोलिस तपासात राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. अटक केलेला संशयित माझा कार्यकर्ता असला तरी त्याला संरक्षण दिलेले नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे. मी बेकायदेशीर कृत्यांना कधीच पाठिंबा देणार नाही, असे स्पष्टीकरण पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी केले.
(Police investigation into firing case related to illegal sand mining case)
या प्रकरणातील संशयिताला मंत्री काब्राल हे पुष्पहार घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर ते म्हणाले की, संशयिताची आई पंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आली होती. तिला निवडून आणण्यामागे त्याचा वाटा होता. भविष्यात तो असे काही कृत्य करील हे कोणाला माहीत नसते. पोलिसांना या प्रकरणाचा तपास त्यांच्या पद्धतीने करण्यास सांगितले आहे. तो जरी भाजपचा व माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ता असला तरी त्याला संरक्षण देऊ शकत नाही.
...हा तर मोदींचा करिष्मा
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या त्या 8 आमदारांबाबत काब्राल म्हणाले की, त्यांच्या प्रवेशामुळे भाजप अधिक मजबूत झाला आहे. पक्षात जर नेते येत असतील त्यांना कोणी अडवू शकत नाही. देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाच्या धडाक्यामुळे इतर पक्षांमधील नेते भारावून गेले आहेत. त्यामुळे गोव्यातच नव्हे, तर पूर्ण देशात मोठ्या प्रमाणात नेते भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.