"खिशात नाही दमडी अन् खायला हवी कोंबडी" पाकड्यांची पुन्हा लाज गेली, हॉटेलचं बिल भरायला पैसे नाहीत; संपूर्ण संघ रस्त्यावर

Pakistan Team: मोठ्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानकडे आपल्या राष्ट्रीय हॉकी संघासाठी साधे हॉटेल बुक करण्याचेही पैसे नसल्याचे उघड झाले आहे.
Pakistan Team
Pakistan TeamDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानी क्रीडा विश्वातून एक अत्यंत लाजीरवाणी घटना समोर आली आहे. मोठ्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानकडे आपल्या राष्ट्रीय हॉकी संघासाठी साधे हॉटेल बुक करण्याचेही पैसे नसल्याचे उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियात FIH प्रो लीग खेळण्यासाठी गेलेल्या पाकिस्तान हॉकी संघाला राजधानी कॅनबेरामध्ये पोहोचल्यावर कित्येक तास रस्त्यावरच घालवावे लागले. हॉटेलचे बिल वेळेवर न भरल्यामुळे प्रशासनाने त्यांची बुकिंग रद्द केली होती, ज्यामुळे खेळाडूंची मोठी फजिती झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हॉकी महासंघाने खेळाडूंसाठी 'फोर स्टार' हॉटेल बुक केल्याचा दावा केला होता. मात्र, संघ कॅनबेरामध्ये पोहोचला तेव्हा तिथे कोणतीही बुकिंग नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. हॉटेलने खोल्या देण्यास नकार दिला.

धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तान बोर्ड आणि ऑस्ट्रेलियातील वेळेतील फरकामुळे मुख्य प्रशिक्षक ताहिर जमान यांना तातडीने बोर्डाशी संपर्कही साधता आला नाही. प्रदीर्घ प्रवास करून आलेल्या खेळाडूंना विश्रांतीसाठी जागा नसल्याने अखेर एकाच खोलीत दोन-तीन खेळाडूंना दाटीवाटीने राहावे लागले.

Pakistan Team
Goa Agriculture: दुर्गंधीयुक्त मळीमुळे मिरची शेती धोक्यात, खालवडे-काणकोण येथे ओहोळाच्या पाण्यासह शेतजमीनही प्रदूषित

मैदानावरील कामगिरीवरही परिणाम

या सर्व मानसिक आणि शारीरिक त्रासाचा परिणाम थेट खेळाडूंच्या कामगिरीवर दिसून आला. पुरेशी विश्रांती आणि तयारी न मिळाल्यामुळे पुढच्याच दिवशी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून २-३ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. नियोजनाचा अभाव आणि आर्थिक चणचणीमुळे खेळाडूंना मैदानात उतरण्यापूर्वीच मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले.

Pakistan Team
Goa Tourist Assault: आगोंद किनाऱ्यावर दिवसाढवळ्या राडा! परदेशी महिला पर्यटकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण; 22 वर्षीय रोहनला बेड्या

आर्थिक संकटाची जुनीच मालिका

पाकिस्तान संघासोबत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अर्जेंटिनामध्ये झालेल्या प्रो लीगच्या पहिल्या टप्प्यातही खेळाडूंना त्यांचे दैनंदिन भत्ते मिळाले नव्हते. ऑस्ट्रेलियातही अशीच परिस्थिती ओढवल्यावर अखेर तिथे राहणाऱ्या स्थानिक पाकिस्तानी नागरिकांनी पुढाकार घेऊन संघाला मदत केली. आपल्या खेळाडूंना साध्या मूलभूत सुविधाही न देऊ शकणाऱ्या पाकिस्तानच्या क्रीडा बोर्डावर आता जगभरातून टीका होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com