Vasco

 

Dainik Gomantak

गोवा

खबरदारीसाठी पोलीस निरीक्षकांचा वास्कोवासियांना सल्ला

त्यामुळे पोलिसांना होणाऱ्या घटनेचा उलगडा करण्यासाठी मदत मिळणार. त्यासाठी प्रत्येक दुकानदार इमारतीत तसेच इतर लहान-मोठ्या आस्थापनात सीसीटीव्ही असणे अत्यंत गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को : वाढत्या चोऱ्या अपघात व इतर घडामोडी विषयी वास्को पोलीस स्थानकात नागरिक सुरक्षा मेळाव्याचे आयोजन करून वास्को पोलीस निरीक्षक निलेश राणे यांनी वास्कोतील उद्योजकांना सुरक्षेविषयी धडे दिले.

वास्को शहरात व इतर ठिकाणी होणारे अपघात, चोऱ्या प्रमाणात वाढ झाली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच देखरेख ठेवण्यासाठी दुकानदारांचा, शहरी लोकांचा, तसेच इमारतीतील लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोलिसांना होणाऱ्या घटनेचा उलगडा करण्यासाठी मदत मिळणार. त्यासाठी प्रत्येक दुकानदार इमारतीत तसेच इतर लहान-मोठ्या आस्थापनात सीसीटीव्ही असणे अत्यंत गरजेचे आहे.

सदर सीसीटीव्ही बसविले म्हणजे झाले असे नाही, तर त्याची योग्यरीत्या निगा कशी राखावी ते कोणत्या प्रकारे लावावे, कॅमेर्‍यासमोर येणारे अडथळे याची दखल घेणे या विषयी महत्त्वपूर्ण असे धडे वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक नीलेश राणे यांनी आज येथील वास्कोतील उद्योजक, दुकानदार, आस्थापनांचे मालक, इमारत मालक यांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

वास्को (Vasco) पोलीस स्थानकात बोर्ड बोलावलेल्या बैठकीत या वेळी वास्कोतील सुमारे 30 हून अधिक उद्योजक, दुकानदार तसेच इतर व्यापारी होते. पोलीस निरीक्षक राणे यांच्या सूचना त्यांनी ऐकून घेतल्या. तसेच आपलेही विचार पोलीस निरीक्षकका समक्ष मांडले.

यावेळी शहरातील मुख्य सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचे काही उद्योजकांनी पोलीस निरीक्षक राणे यांच्या नजरेस आणून दिले. राणे यांनी आपल्या आस्थापनातील, दुकानांतील, इमारतीतील कॅमेरे कशाप्रकारे लावावे जेणेकरून एखादी चोरी किंवा अपघाताची व अन्य घटना घडल्यास पोलिस कारवाई सोयीस्कर होईल. याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती वास्को पोलीस निरीक्षक राणे निलेश राणे यांनी दिली.

या बैठकी विषयी पोलीस निरीक्षक राणे यांना विचारले असता शहरात व इतरत्र वाढत्या चोर्‍या व अपघात तसेच अन्य घटना यावर ताबा मिळवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असून त्यासाठी तितकेच मोलाचे सहकार्य शहरातील दुकानदार, उद्योजक व अन्य व्यापाऱ्यांचे असणे गरजेचे आहे. काही दुकानदार सीसीटीव्ही लावतात पण तो नादुरुस्त असलेला आढळतो. एखादा बाका प्रसंग उद्भवला व त्या कॅमेर्‍यातून घटना पाहण्यास त्या कॅमेराची मदत घेतली तर तो नादुरुस्त आढळतो व कारवाईस अडथळा निर्माण होतो.

त्यासाठी प्रत्येक उद्योजकांनी आपल्या दुकानासमोर, आस्थापन किंवा इमारतीसमोर सीसीटीव्ही कॅमेरे कोणत्या प्रकारे लावावे व हाताळावे याविषयी माहिती देण्यात आली आहे. असे त्यांनी सांगताना, याविषयी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. येथील उद्योजक ॲड. ग्लक डिसोझा यांनी या महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याबद्दल वास्को पोलिस निरीक्षक राणे यांचे आभार मानले.

सीसीटीव्ही कॅमेरा हा गरजेचा असून तो सगळ्या दुकानदारांनी, आस्थापनात, इमारतीत असणे म्हणजे आपली सुरक्षा असे ते म्हणाले. या विषयी आपण पोलीसांना सहकार्य करण्यास सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले व इतरांनाही या विषयी सगळ्यांनी गांभीर्याने घेऊन सदर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT