Varca Murder Case Dainik Gomantak
गोवा

वार्का खूनप्रकरणी आणखी एक संशयित‍ ताब्‍यात

खून प्रकरणात परप्रांतीय तरुणाचा हात असल्याचा पोलिसांना संशय

दैनिक गोमन्तक

मडगाव : वार्का येथील त्रिनिदाद मार्टिन्स या 80 वर्षीय वृद्धच्या खुनात हात असण्याची शक्यता गृहीत धरुन कोलवा पोलिसांनी काल रात्री उशिरा एका परप्रांतीय इसमाला ताब्यात घेतले आहे. त्याला अजून अटक करण्यात आली नसली तरी खून झाला त्या दिवशी त्याचा त्या परिसरात वावर होता का, याचा तपास पोलिस करत आहेत. (Varca Murder Case News Updates)

घरात एकटेच राहणाऱ्या मार्टिन्स यांचा चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी खून झाला होता. त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईपचा प्रहार करण्‍यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी (Police) मयताची मुलगी जुबेल (37) हिला अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून तिने आपल्या वडिलांचा खून (Murder) केल्याचा पोलिसांचा कयास आहे. मात्र जुबेलने हा खून अन्य कुणा दुसऱ्याकडून करून घेतला असावा अशीही पोलिसांना शंका आहे. त्यामुळेच त्या व्‍यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काल अटक करण्यात आलेल्या झुबेल हिला रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी तिला सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आल्‍याची माहिती तपास अधिकारी मेल्सन कुलासो यांनी दिली आहे. या प्रकरणी जरी झुबेल हिला अटक (Arrest) केली असली तरी तिने अजून खुनाची कबुली दिलेली नाही.

मयत मार्टिन्स यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याचा वार करून त्‍यांचा खून करण्‍यात आला आहे. त्यांच्या तोंडावरही असंख्य वार करण्यात आले होते. ज्या प्रकारे हा हल्ला झालाय, त्‍याद्वारे हे काम एखाद्या पुरुषाने केल्याचा संशय पोलिसांना आहे. झुबेल हिने या अज्ञात आरोपीशी संगनमत करुन हा खून करवून घेतला असावा, असाही पोलिसांचा कयास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT