Ujita Paradkar Dainik Gomantak
गोवा

Navratri 2022 : कर्तव्‍यतत्‍पर पोलीस अधिकारी उजिता पराडकर यांचा समाजकार्यात लौकिक

2016 मध्ये पोलिस खात्यात उजिता महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. त्यानंतर मागे न वळून पाहता उजिताने नोकरीत सेवाभावी वृत्तीने झोकून दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Navratri 2022 : उजिता पराडकर ह्या गेली पाच वर्षे मुरगाव पोलिस स्थानकात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. मुरगाव पोलिस स्थानकात एकच हेड कॉन्स्टेबल असून पोलिस स्थानकात आरोपी महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणे, उपनिरीक्षक व इतरांच्या कामांना साहाय्य करणे, अशी कामे त्यांना करावी लागतात. सेवा बजावताना कसलीही कटकट न करता आपली सेवा देण्यात त्या सदैव तत्पर असतात. बेतुल ते वास्को असा रोज प्रवास करून त्या मुरगाव पोलिस स्थानकात कार्यरत आहेत.

बेतुल येथे जन्मलेल्या उजिता पराडकर वाणिज्य शाखेत पदवीधर आहे. 2013 साली रोजगार विनिमय केंद्रातून पत्र आले. मात्र त्यावेळी पदवीचे शिक्षण चालू असल्याने वडिलांनी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. ती संधी उजिताने वाया घालवली. जिद्द उराशी बाळगून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. नंतर लगेच 2015 साली पोलिस खात्यात भरतीसाठी पत्र आले. ही संधी मात्र उजिताने वाया न घालवता मुलाखत दिली, तेथे ती उत्तीर्ण झाली आणि 2016 मध्ये पोलिस खात्यात महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. त्यानंतर मागे न वळून पाहता उजिताने नोकरीत सेवाभावी वृत्तीने झोकून दिले.

वरिष्ठांनी दिलेले कोणतेही काम ईश्वरी सेवेप्रमाणेच पूर्ण करते. आजपर्यंत माझ्या वरिष्ठांना तसेच माझ्याबरोबर काम करत असलेल्यांना मोलाची साथ देऊन सहकार्य करते, असे उजिता यांनी सांगितले.

विश्‍वास हाच सन्मान

उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय पातळीवरील ध्वजारोहण कार्यक्रमातील परेडमध्ये सांघिक पारितोषिकेही मला मिळाले. लहान वयात माझ्या कामगिरीवर वरिष्ठांनी दिलेली थाप मला प्रेरणा देणारी ठरली. वरिष्ठांकडून मिळणारी आपुलकी मला माझ्या कामाची उर्जा वाढविते. माझ्यावर वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास माझा सन्मान आहे, असे उजिता म्हणाल्या.

फळांची अपेक्षा नाही

खाकी वर्दी म्हणजे गुन्हेगारी रोखण्यासाठीच नसून समाजात आदर निर्माण करणे, समाजात बरे कार्य करण्यासाठी असते. मी माझे कार्य कोणत्याच फळाची अपेक्षा न करता चालू ठेवणार आहे. बाकी सर्व परमेश्वराच्या हाती आहे. कामात चढ उतार हा असतोच, पण त्यात न डगमगता आपले काम करत राहिलो, तर कोणत्याच प्रकारची अडचण भासत नाही, असेही उजिता म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT