Tiracol Police Constable dies on duty due to Heart Attack Dainik Gomantak
गोवा

Tiracol Police News: तेरेखोल येथे पोलिस कॉन्स्टेबलला हृदयविकाराचा झटका; कर्तव्य बजावत असतानाच मृत्यू

आकस्मिक मृत्यूने परिसरावर शोककळा

Akshay Nirmale

Tiracol Police Constable dies on duty due to Heart Attack: गोव्यात पेडणे तालुक्यातील तेरेखोल किनारी पोलिस स्टेशनमधील कॉन्स्टेबल रणजीत गवंडी यांचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असतानाच गवंडी यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गवंडी यांच्यामागे आई, पत्नी, दोन लहान मुले, दोन भाऊ तसेच विवाहित बहीण असा परिवार आहे.

रणजीत गवंडी हे मूळचे तारसे येथील आहेत. सकाळी तेरेखोल किनारी पोलीस स्थानकात ते नेहमीप्रमाणे कामावर आले. साडेदहाच्या सुमारास सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. इतर सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारांसाठी तुये इस्पितळात दाखल केले.

पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात (गोमेकॉ) आणण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT