Goa Police Picnic Tragedy Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: चिरे खाणीतील आंघोळ बेतली जिवावर, पोलिस कॉन्स्टेबलचा बुडून मृत्यू; सिरसईतील धक्कादायक घटना

Goa Police Picnic Tragedy: मित्रांसमवेत थिवीतील पठारावर सहलीसाठी गेलेल्या पर्वरी पोलिस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलचा खाण खंदकात बुडून मृत्यू झाला. आकाश नाईक असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

Manish Jadhav

थिवी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार सरी बरसत असून सरकारने धबधबे, चिरेखाणी येथे आंघोळीसाठी बंदी घातली आहे. याचदरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसमवेत थिवीतील पठारावर सहलीसाठी गेलेल्या पर्वरी पोलिस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलचा खाण खंदकात बुडून मृत्यू झाला. आकाश नाईक असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आकाश नाईक (वय, वर्ष 35)आपल्या मित्रांसमवेत मौजमजा करण्यासाठी सिरसई येथील कोणशे येथे पोहोचले होते. यादरम्यान नाईक पावसाच्या पाण्याने भरलेल्या एका विहीर वजा खंदकात पोहोण्यासाठी उतरले असता खंदकाच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. कोलवाळ पोलिस स्थानकाला संध्याकाळी 6.45 वाजता माहिती मिळताच उप निरीक्षक संतोष जाधव आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. अग्निशमनदल आणि पोलिसांच्या मदतीने आकाश यांना पाण्याबाहेर काढून तात्काळ म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी नाईक यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

नाईक विवाहित होते

कोलवाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उप निरीक्षक संतोष जाधव यांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह पोस्टमोर्टमसाठी बांबोळी येथे पाठवला आहे. कॉन्स्टेबल नाईक हे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. सद्या ते पर्वरी पोलीस स्थानकावर कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. हल्लीच पर्वरीतून कळंगुट‌ पोलिस स्थानकात त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly Session Live: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर!

SCROLL FOR NEXT