Datta Naik Goa Dainik Gomantak
गोवा

Datta Naik: लेखक दत्ता नायक यांच्या अडचणीत वाढ; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आता गोवा पुरोहित संघाकडून पोलिस तक्रार

Police Complaint Against Datta Naik: ब्राम्हण समाजाच्या विरोधात दिशाभूल करणारी माहिती लिहल्याप्रकरणी गोवा पुरोहित संघाने ही तक्रार दाखल केली आहे

Akshata Chhatre

पणजी: पर्तगाळ मठ आणि भट-पुरोहित वर्गाच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उद्योजक, लेखक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल झालीय. ब्राम्हण समाजाच्या विरोधात दिशाभूल करणारी माहिती लिहल्याप्रकरणी गोवा पुरोहित संघाने ही तक्रार दाखल केली आहे. नायक यांच्या विरोधात यापूर्वी याच प्रकरणात गुन्हा नोंद झाला आहे.

गोवा पुरोहित संघाने नोंदवलेल्या तक्रारीनुसार दत्ता नायक यांच्याकडून दै. गोमंतकमध्ये २४ डिसेंबर २०२४ या दिवशी यांच्याविषयी दिशाभूल करणारा लेख लिहिला गेला होता. पुरोहित संघाने केलेल्या आरोपानुसार भगवान परशुरामाकडून क्षत्रियांचे २१ वेळा निर्दालन केले गेले ही बाब मराठीकुलीन देसाई विसरले आहेत का? त्यांनी ब्राम्हणांचा सूड उगवला पाहिजे, ब्राह्मणांवर बहिष्कार टाकला पाहिजे असे म्हणत भगवान परशुराम यांच्याविषयी दिशाभूल करणारी माहिती नायक यांनी लिहिली होती. लेखाचा प्रमुख मुद्दा काही वेगळाच असताना त्यांनी ब्राम्हणवाद उकरून काढला असल्याचा आरोप पुरोहित संघाने केलाय.

यापूर्वी एका मुलाखतीत दत्ता नायक यांनी केलेल्या विधानामुळे गोव्यातील सामाजिक शांतता बिघडली आहे असेही समुहाने आरोपपत्रात नमूद केले आहे.

गोवा एक शांतताप्रिय आणि सामाजिक बांधिलकी जपत खेळीमेळीने वावरणारं राज्य असताना अशी विधानं त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करतायत असे म्हणत ब्राम्हण समूहाकडून हिंदूंचे आदरस्थान भगवान परशुराम यांच्यावर अयोग्य टिप्पणी करणाऱ्या दत्ता नायक यांच्या विरोधात योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दत्ता नायक आणि वाद:

एका मुलाखतीत दत्ता नायक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सामाजिक शांततेचा भंग होतेय तसेच धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरुद्ध मडगाव आणि काणकोण पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होत . "मी मुळात सेक्युलर विचाराचा आहे. हिंदुत्ववाद, भाजप, आरएसएस हे मला मान्य नाही. ख्रिश्चन, मुस्लिमांचा द्वेष करुन हा देश खड्यात जाईल. मी देवळात दान करत नाही. मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात", असे वक्तव्य नायक यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT