Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश, 4 लाखांच्या रोकडसह 4 दुचाकी जप्त; अल्पवयीन मुलगा अटकेत

Goa Police: पोलिसांनी 4 लाखांची रोकड आणि 4 दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी ललित वायंगणकर (वय वर्ष 19, रा. सडये, शिवोली) याच्यासह 17 वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.

Manish Jadhav

Goa Crime: राज्यात गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी धूमाकूळ घातला असतानाच पोलिसांनी चोरट्यांच्या एका टोळीचा पर्दाफाश केला. दुचाकी आणि मंदिरात चोरी करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पर्वरी पोलिसांना यश आले. यावेळी पोलिसांनी 4 लाखांची रोकड आणि 4 दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी ललित वायंगणकर (वय वर्ष 19, रा. सडये, शिवोली) याच्यासह 17 वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. तर या टोळीतील आणखी दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

मंदिर फोडीप्रकरणात अल्पवीयन मुलाचा हात

दरम्यान, धुळेर म्हापसा येथे राहणारा आणि मूळचा महाराष्ट्रातील (Maharashtra) अल्पवयीन मुलाचा 16 जानेवारी रोजी झालेल्या मयडे पुलार येथील रवळनाथ मंदिर फोडीप्रकरणात हात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे पर्वरी पोलिसांनी त्याला म्हापसा पोलिसांच्या ताब्यात दिले.

बुलेट चोरी

मिळालेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी रोजी पर्वरीतील पीडीए कॉलनीमधून रात्री 1.10 च्या सुमारास सौरभ नावाच्या तरुणाची जीए 4पी 5100 नंबरची बुलेट चोरीस गेली होती. पोलिसांनी या चोरी प्रकरणात तपास कार्य सुरु केले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT