Kidnapping Dainik Gomantak
गोवा

अपहरणकर्त्याच्या मोबाईल लोकेशन्सचा शोध सुरू

अल्पवयीन शालेय मुलीच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : अल्पवयीन शालेय मुलीच्या अपहरण प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली आहेत. तर अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी मोबाईल लोकेशन व डिटेल्स हस्तगत करण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. तसेच या प्रकरणी पोलिस एकाच्या मागावर असून त्यानेच या मुलीचे अपहरण केल्याच्या संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Police are searching for the abductee's mobile location)

दिनांक २४ फेब्रुवारी रोजी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे (girl) अपहरण (kidnapping) करण्यात आले असल्याची तक्रार त्यांच्या पालकांकडून कुंकळ्ळी पोलीस (police) स्थानकात दाखल करण्यात आली होती. कुंकळ्ळी येथील सावरकट्टा येथे राहणाऱ्या संशयित संदीप पाटील या युवकाने शालेय (school) मुलीचे अपहरण केले असल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन आणि कॉल्स डिटेल्सच्या तपासणीला सुरुवात केली आहे. या युवकाचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर या विषयी सविस्तर माहिती समोर येणार असल्याचे स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर याने माहिती देताना सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणी ३६३ व गोवा बालकायदा (Goa Children’s Act) कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या विषयी उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT